MS Dhoni, IPL 2023: टीम इंडिया आणि चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) यशस्वी कर्णधार म्हणून महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) नावारूपाला आला. आपल्या कूल आणि संयमी खेळीच्या जोरावर धोनीने आत्तापर्यंत अनेक सामने तडीपार केले आहेत. कितीही प्रेशर असला तरी हा गडी आपल्या विश्वासावर कायम असतो. धोनी स्वत:ला नेहमी सिद्ध करत आलाय. त्यामुळे आजही टीम इंडियामध्ये खेळत नसला तरी करोडो चाहते त्याच्या बॅटिंगची फॅन आहेत. असा हा धोनी सध्या चर्चेत आलाय. धोनीचा एक व्हिडिओ (MS Dhoni Viral Video) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी चेपॉकच्या (MA Chidambaram Stadium) मैदानावर खेळल्या गेलेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जचा (CSK vs DC) कर्णधार धोनीने संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर (Deepak Chahar) याला मारहाण केल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला आहे. चेन्नईने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. टॉस झाला आणि धोनीने आपला निर्णय सांगितला. त्यानंतर धोनी पवेलियनकडे येत होता. त्यावेळी संघाचे काही खेळाडू मैदानात प्रॅक्टिस करत होते. त्याचवेळी ही घटना घडली.


नेमकं काय झालं?


टॉस झाल्यानंतर धोनी खेळपट्टीजवळून जात होता, त्याचवेळी चहर सीएसकेचे बॉलिंग कोच ड्वेन ब्राव्होसोबत (Dwayne Bravo) उभा होता. चहर ब्राव्हो यांच्यात चर्चा सुरू असताना धोनी ड्रेसिंग रूमकडे (Dressing Room) जात होता. त्यावेळी गंमतीने धोनीने चहरला टपली मारण्याचा प्रयत्न केला पण चहर मागे हटल्याने टपली बसली नाही, यानंतर दोन्ही खेळाडू हसताना दिसते. मात्र, सोशल मीडियावर हा व्हिडिओ (Viral Video) समोर येताच एकच वाद उभा राहिलाय.


पाहा Video



दरम्यान, हा कसला कॅप्टन कूल? असं म्हणत काही नेटकऱ्यांनी धोनीवर टीका केलीये. तर काहींनी धोनीच्या या मनमोकळे स्वभावाचं कौतूक केलंय. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात दुखापतीमुळे चहर बराच काळ प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर होता. त्यानंतर चहर 3 मे रोजी लखनऊ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात चेन्नईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तो पुन्हा परतला. आजच्या सामन्यात थालाने 9 बॉलमध्ये 20 धावांची वादळी खेळी केलीये. यात 2 सिक्स आणि 1 फोरचा समावेश आहे.