नवी दिल्ली : न्यूझीलंडविरोधातील सीरिज संपल्यानंतर टीम इंडियाचे सर्व प्लेअर्स आपल्या घरी परतले आहेत. श्रीलंकेविरोधातील सीरिजपूर्वी महेंद्रसिंग धोनी आपली पत्नी साक्षी आणि मुलगी झिवासोबत वेळ घालवत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनी आपल्या कुटुंबासोबत एन्जॉय करत असताना एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत धोनीची पत्नी साक्षीही दिसत आहे. तर, धोनी डान्स करत असल्याचं दिसत आहे.


महेंद्रसिंग धोनीचा हा डान्स व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. हा डान्स इतका जबरदस्त आहे की तो पाहिल्यानंतर तुम्हीही स्वत:ला हसण्यापासून रोखू शकणार नाही.


साक्षी आपला पती महेंद्रसिंग धोनी याला डान्स करण्यासाठी सांगते. सुरुवातीला धोनी खूप लाजत असतो. मात्र, नंतर 'देसी बॉयज'च्या 'झक मारके' गाण्यावर माही नाचण्यास सुरुवात करतो.



या गाण्यावर धोनी असा काही डान्स करतो की तो पाहून साक्षीही हसून-हसून सोफ्यावर लोळायला लागते. ३७ सेकंदांच्या हा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड शेअर केला जात आहे.



यापूर्वी धोनी ऑस्ट्रेलियाविरोधात टी-२० सीरिज खेळण्यापूर्वी आपल्या कुत्र्यासोबत खेळताना पहायला मिळाला होता. धोनीची पत्नी साक्षीने इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला होता.