मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या ११ व्या सीजनला आजपासून सुरुवात होते आहे. मुंबई इंडियंस आणि चेन्नई सुपरकिंग्समध्ये आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. मुंबई इंडियंस ही मागच्या सीजनची चॅम्पियन आहे तर चेन्नई सुपरकिंग्स दो वर्षापासून बॅन लागल्यामुळे आयपीएलमधून बाहेर होती. दोन्ही संघासाठी हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे. दोन्ही टीम पूर्ण जोर लावून सामना जिंकण्य़ाचा प्रयत्न करणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा मुंबईला होऊ शकतो. दोन्ही टीममध्ये य़ा मैदानावर १० सामने झाले आहेत त्यामध्ये ४ मुंबईने जिंकले आहेत. मुंबईकडे हार्दिक आणि कुणाल पांड्याच्या रुपात २ चांगले ऑलराउंडर आहेत. रोहित शर्माच्या कॅप्टन्सीमध्ये मुंबई इंडियंसने आतारपर्यंत चांगली कामगिरी केली आहे. रोहित खूप कुल माईंडेड कर्णधार आहे. त्याने हा गुण महेंद्र सिंह धोनीकडून शिकला आहे. डेथ ओवरमध्ये जसप्रीत बुमराहची भेदक बॉलिंग चेन्नई सुपरकिंग्ससाठी भारी पडू शकते.


चेन्नई सुपरकिंग्सची ताकत कर्णधार महेंद्र सिंह धोनी आहे. धोनी खूप दिवसानंतर कॅप्टन्सी करतांना दिसत आहे. सुरेश रैनाने मागील सीजनमध्ये टी20 मध्ये चांगली कामगिरी केली होती. आयपीएलमधला तो बेस्ट रन स्कोरर आहे. चेन्नई सुपरकिंग्सला रैनाची चांगली मदत होऊ शकते. ड्वेन ब्रावो हे चेन्नईची आणखी एक ताकत आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याच्या टीमसाठी तो खेळ बदलू शकतो. स्पिनर इमरान ताहिर आणि हरभजन सिंग सारखे २ अनुभवी बॉलर त्यांच्या टीममध्ये आहे.