Mumbai Indians च्या चाहत्यांसाठी मोठी बातमी, Head coach पदी `या` विश्वविक्रमी खेळाडूची निवड
Mumbai Indians 2023 : मुंबई इंडियन्सने माजी वेगवान गोलंदाज झहीर खान आणि श्रीलंका टीमचा माजी कर्णधार महेला जयवर्धने यांच्यावर नवी जबाबदारी सोपवली आहे. त्यानंतर आता आज त्यांनी इंडियन प्रीमिअर लीग 2023 ( IPL 2023) साठी मुंबई इंडियन्सच्या नव्या प्रशिक्षकाचे नाव जाहीर केले.
Mumbai Indians 2023 : मुंबई इंडियन्सने त्यांच्या चाहत्यांना मोठी बातमी दिली. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians 2023) माजी वेगवान गोलंदाज झहीर खान (Zaheer Khan) आणि श्रीलंका टीमचा माजी कर्णधार महेला जयवर्धने (Mahela Jayawardene) यांच्यावर नवी जबाबदारी सोपवली आहे. (Mumbai Indians appoints New Head Coach Mark Boucher)
त्यानंतर आता आज त्यांनी इंडियन प्रीमिअर लीग 2023 ( IPL 2023) साठी मुंबई इंडियन्सच्या नव्या प्रशिक्षकाचे नाव जाहीर केले. दक्षिण आफ्रिकेकडून विश्वविक्रमाची नोंद करणाऱ्या दिग्गज खेळाडूवर त्यांनी ही जबाबदारी सोपवली आहे.
मुंबई इंडियन्सचा विस्तार वाढला आहे. या फ्रँचायझीने दक्षिण आफ्रिका व युएई येथे होणाऱ्या ट्वेंटी-२० लीगमध्ये संघ खरेदी केला आहे. त्यामुळे माहेला जयवर्धने ( Mahela Jayawardene) व क्रिकेट डेव्हलपमेंट प्रमुख झहीर खान ( Zaheer Khan) यांच्यावर अनुक्रमे Global Head of Performance व Global Head of Cricket Development ही जबाबदारी सोपवली गेली आहे. त्यात आफ्रिकन लीगमधील MI Cape Town संघासाठी कोचिंग स्टाफची घोषणा केली. ऑस्ट्रेलियन दिग्गज सायमन कॅटिच ( Simon Katich ) यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे. दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज हाशिम आमला ( Hashim Amla) हा फलंदाज प्रशिक्षक असणार आहे, तर जेम्स पॅमेंटकडे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक, रॉबिन पीटरसन जनरल मॅनेजर असणार आहे.
वाचा : 'ही' आहे देशातील सर्वात स्वस्त Electric Car ! किंमत आहे फक्त ..
मुख्य प्रशिक्षकपदी नवा गडी...
मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians 2023) मुख्य प्रशिक्षकपदी दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज मार्क बाऊचर ( Mark Boucher) याची निवड केली गेली आहे. बाऊचरने आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर दक्षिण आफ्रिकेच्या मुख्य प्रशिक्षकपदी कायम राहणार नसल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये यष्टिंमागे 400 बळी टीपणारा पहिल्या खेळाडूचा विक्रम बाऊचरने केला आहे.
ऑगस्ट 2016 मध्ये बाऊचरकडे स्थानिक संघ टायटन्सच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली गेली होती आणि प्रशिक्षणाचा अनुभव नसतानाही त्यांनी दोन वन डे कप व दोन ट्वेंटी-20 चॅलेंज चषक जिंकले. शिवाय सनफॉईल सीरीज ही चार दिवसीय सामन्यांची मालिकाही जिंकली होती.