WPL 2023 MI vs GG : Mumbai Indians ची विजयी घौडदौड सुरुच; गुजरातचा उडवला धुव्वा
मुंबईने गुजरातवर 55 रन्सने विजय मिळवला आहे. मुंबईने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना गोलंदाजांसमोर गुजरातच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. मुंबई इंडियन्सचा हा सलग पाचवा विजय होता.
WPL 2023 MI vs GG : महिला प्रिमीयर लीगमध्ये (WPL 2023) आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरूद्ध गुजरात जाएंट्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यामध्येही मुंबई इंडियन्सच्या टीमने आपली विजयी घौडदौड सुरुच ठेवली आहे. मुंबईने गुजरातवर 55 रन्सने विजय मिळवला आहे. मुंबईने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना गोलंदाजांसमोर गुजरातच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. मुंबई इंडियन्सचा हा सलग पाचवा विजय होता.
गुजरातची फलंदाजी गडगडली
मुंबईने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजराची टीम पत्त्याप्रमाणे ढेपाळली. गुजरातकडून हरलीने देओलने सर्वाधिक म्हणजेच 22 रन्स केले. त्यानंतर स्नेह राणाने 20 रन्सची खेळी केली. याशिवाय शुष्मा वर्माने 18 तर सब्बिनेनी मेघनाने 16 रन्स केले. याशिवा कोणालाही दुहेरी धावसंख्या गाठता आलेली नाही. 20 ओव्हर्समध्ये गुजरातने 9 विकेट्स गमावत 107 रन्सपर्यंत मजल मारली.
मुंबईचं गुजरातला 163 रन्सचं आव्हान
गुजरात जाएंट्सच्या महिलांनी प्रथम टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजीला उतरलेल्या मुंबईच्या टीमची पहिली विकेट लवकर गेली. हेली मॅथ्यूज आजच्या सामन्यात भोपळाही फोडू शकली नाही. मात्र मुंबईची दुसरी ओपनर यास्तिका भाटीया हिने चांगला खेळ करत 37 बॉल्समध्ये 44 रन्सची खेळी केली.
हरमनप्रीतची पुन्हा हाफ सेंच्युरी
आजच्या सामन्यात पुन्हा एकदा चाहत्यांना हरमनप्रीत कौरची उत्तम फलंदाजी पहायला मिळाली. कर्णधार हरमनप्रीत कौरने 30 बॉल्समध्ये 51 रन्सची खेळी केली. तिच्या या खेळीत 7 फोर आणि 2 सिक्सेसचा समावेश होता. याशिवाय मुंबईकडून नेट सीवर-ब्रंट हिनेही 36 रन्स केले.
मुंबई इंडियन्स प्लेईंग 11
हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नेट सीवर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), धारा गुर्जर, अमेलिया केर, इसी वोंग, अमनजोत कौर, हुमैरा काजी, जिंतिमनी कलिता, सायका इशाक
गुजरात जाएंट्स प्लेईंग 11
सब्बिनेनी मेघना, सोफिया डंकले, हरलीन देओल, एश्ले गार्डनर, दयालन हेमलता, एनाबेल सदरलैंड, सुषमा वर्मा (विकेटीकपर), किम गर्थ, तनुजा कंवर, स्नेह राणा (कर्णधार), मानसी जोशी