धोनीच्या लाडक्याचं घरवापसीचं स्वप्न भंगलं, ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सच्या गळाला लागला
. पहिल्या दिवशी ऑक्शनमध्ये एकूण 72 खेळाडूंवर बोली लावण्यात आली. तर सोमवारी 25 नोव्हेंबर रोजी पुन्हा दुपारपासून ऑक्शनला सुरुवात करण्यात आली.
IPL 2025 Mega Auction : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL205) 18 व्या सीजनसाठी सौदी अरेबियाच्या जेद्दाह शहरात मेगा ऑक्शन आयोजित करण्यात आलं आहे. या ऑक्शनमध्ये जगभरातील 1500 हुन अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता त्यापैकी केवळ 577 खेळाडूंना ऑक्शनसाठी निवडण्यात आले आहे. पहिल्या दिवशी ऑक्शनमध्ये एकूण 72 खेळाडूंवर बोली लावण्यात आली. तर सोमवारी 25 नोव्हेंबर रोजी पुन्हा दुपारपासून ऑक्शनला सुरुवात करण्यात आली. या ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) धोनीच्या लाडक्या खेळाडूला मोठी रक्कम मोजून आपल्या संघात घेतलं आहे.
दीपक चहरच्या घरवापसीचं स्वप्न भंगलं :
चेन्नई सुपरकिंग्सने आयपीएल 2025 मेगा ऑक्शनपूर्वी केवळ 5 खेळाडूंना रिटेन केले. यात ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, पथीराणा, शिवम दुबे आणि एम एस धोनीचा समावेश होता. दीपक चहर मागील अनेक वर्षांपासून चेन्नई सुपरकिंग्सचा भाग होता. मात्र ऑक्शनपूर्वी चेन्नईने त्याला रिटेन केलं नाही त्यामुळे त्याला ऑक्शनमध्ये यावे लागले. दीपक चहर हा चेन्नईचा माजी कर्णधार एम एस धोनीच्या फार जवळचा खेळाडू होता. ऑक्शनपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत चहरने चेन्नई त्याला ऑक्शनमध्ये पुन्हा विकत घेईल असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र ऑक्शनमाहे तसं घडलं नाही. चहर ऑक्शन टेबलवर आल्यावर त्याच्यासाठी आरसीबी, राजस्थान आणि मुंबई इंडियन्समध्ये चुरस रंगली होती. चेन्नईने देखील चहरवर बोली लावली मात्र चहरची बोली वाढत गेल्याने ते त्याला खरेदी करू शकले नाहीत. अखेर मुंबई इंडियनने दीपक चहरवर 9.25 कोटींची बोली लावून त्याला आपल्या संघात घेतले.
हेही वाचा : मुंबईचे तीन शिलेदार IPL मेगा ऑक्शनमध्ये राहिले Unsold, एक तर टीम इंडियाचा माजी कर्णधार
दीपक चहरची आयपीएल कारकीर्द :
दीपक चहर हा वेगवान गोलंदाज असून त्याने आतापर्यंत आयपीएलचे एकूण 81 सामने खेळले असून यात त्याने 77 विकेट्स घेतल्या. तर 80 धावा सुद्धा केल्या आहेत.