IPL Points Table : यशस्वी जयस्वालच्या (Yashasvi Jaiswal) शतकीय खेळीमुळे राजस्थानने पुन्हा मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) पाणी पाजलं. राजस्थानकडून झालेल्या पराभवानंतर मुंबईने मागील जयपूरवर पराभवाची 12 वर्षांची परंपरा कायम ठेवली आहे. मुंबईला आत्तापर्यंतच्या 8 सामन्यात फक्त 3 विजय मिळवता आले आहेत. त्यामुळे आता मुंबई इंडियन्स पाईट्स टेबलमध्ये सध्या 7 व्या स्थानी कायम आहे. मुंबईचा नेट रननेट -0.23 असल्याने आता त्यांना नेट रननेट देखील सुधारावा लागणार आहे. मुंबईसाठी आता आगामी गणित (MI Playoffs Scenario) कसं असणार आहे? याचं गणित पाहुया...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईसाठी कसं असेल प्लेऑफचं गणित


मुंबई इंडियन्सला आणखी 6 सामने खेळायचे आहेत. त्यामुळे आता मुंबईला जर प्लेऑफ गाठायचं असेल तर उर्वरित 6 सामन्यांपैकी 5 सामने तरी जिंकावे लागणार आहेत. या 6 सामन्यांपैकी मुंबईला लखनऊविरुद्ध 2 आणि केकेआरविरुद्ध 2 सामने खेळायचे आहेत. तर तगड्या हैदराबादसोबत 1 सामना तर दिल्लीविरुद्ध देखील 1 सामना खेळायचा आहे. उर्वरित 6 सामन्यांपैकी 3 सामने मुंबई इंडियन्स घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडेवर खेळणार आहे. त्यामुळे आता मुंबईसाठी हा एक प्लस पाईट्स असणार आहे. मुंबईला हैदराबादचा सामना टफ जाण्याची शक्यता आहे. तर केकेआरविरुद्ध देखील मुंबईला मजबूत तयारी करावी लागणार आहे.


मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 20 षटकात 9 गडी गमावून 179 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने यंदाच्या आयपीएलचं पहिलं शतक झळकावलं. त्याने 59 चेंडूत शतक ठोकलं अन् जोरदार कमबॅक केलंय. त्याचं आयपीएल कारकिर्दीतील हे दुसरं शतक आहे. जयस्वालच्या या शतकीय खेळीमुळे आणि संदीप शर्माच्या धारदार गोलंदाजीमुळे राजस्थानला 9 विकेट्सने सामना जिंकता आला. त्यामुळे आता राजस्थान रॉयल्ससाठी प्लेऑफ फक्त एक पाऊल लांब आहे.


राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा आणि युझवेंद्र चहल.


मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, नेहल वढेरा, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला आणि जसप्रीत बुमराह.