Mumbai Indians : मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) ही आयपीएलच्या ( IPL 2023 ) इतिहासातील सर्वात यशस्वी टीम मानली जाते. यंदाच्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सच्या टीमची सुरुवातीला कामगिरी काही फारशी चांगली नव्हती. मात्र त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या टीमने उत्तम कमबॅक करत आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये तिसरं स्थान गाठलं आहे. मुंबईच्या चाहत्यांना टीमने प्लेऑफमध्ये ( IPL Playoff ) समावेश करावा, असं वाटतंय. मात्र कदाचित चाहत्यांच्या अपेक्षेवर पाणी फिरण्याची शक्यता आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians ) यंदाच्या आयपीएलमध्ये एकूण 12 सामने खेळले आहेत. यामधील 7 सामन्यांमध्ये मुंबईला विजय मिळवता आला आहे. यामुळे 14 पॉईंट्समुळे ( IPL Points Table ) मुंबईची टीमने तिसरं स्थान गाठलंय. मात्र यावेळी मुंबईला 5 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागलाय. दरम्यान मुंबईला प्लेऑफचं तिकीट मिळणार का हा प्रश्न चाहत्यांसमोर आहे. 


मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) प्लेऑफच्या रेसमधून बाहेर?


14 पॉईंट्समुळे अजूनही मुंबईच्या  ( Mumbai Indians ) टीमचं प्लेऑफमध्ये स्थान निश्चित झालेलं नाही. अशावेळी प्लेऑफच्या रेसमधून बाहेर होण्याची टांगती तलवार मुंबईच्या टीमवर आहे. यंदाच्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सचे अजून 2 सामने खेळायचे बाकी आहेत. यामधील एक सामना लखनऊ सुपर जाएंट्ससोबत ( Lucknow Super Giants ) आहे, तर दुसरा सामना सनरायझर्स हैदराबासोबत खेळायचा आहे. 


कसं आहे प्लेऑफचं समीकरण?


मंगळवारी मुंबई इंडियन्सला लखनऊ सुपर जाएंट्सविरूद्ध सामना खेळायचा आहे. तर मुंबईचा सिझनमधील शेवटचा सामना सनरायझर्स हैदराबादविरूद्ध असणार आहे. हैदराबादविरूद्धच्या पूर्वीच्या सामन्यात मुंबईचा विजय झाला होता. प्लेऑफ गाठण्यासाठी मुंबईला आगामी दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. जर या सामन्यांमध्ये मुंबईचा पराभव झाला तर प्लेऑफचे दरवाजे बंद होणार आहेत. 


मुंबईकडून गुजरातचा पराभव


शुक्रवारी वानखेडेच्या मैदानावर मुंबई इंडियन्स विरूद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये सामना रंगला होता. या सामन्यात मुंबईने 27 रन्सने गुजरातला पराभवाची धुळ चारलीये. मुंबईने प्रथम फलंदाजी करत 218 रन्स केले होते. यावेळी गुजरातला 191 रन्स करता आले. या सामन्यात मुंबईकडून सूर्यकुमार यादवने शतक झळकावलं. त्याच्या आयपीएल करियरमधील हे पहिलं शतक होतं.