Mumbai Indians Team Video Create Doubt In Fans Mind: इंडियन प्रिमिअर लीगच्या 17 व्या पर्वाला 22 मार्चपासून सुरुवात होत आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व संघांनी तयारी सुरु केली असून सराव शिबिरांबरोबरच सोशल मीडियावरही सर्वच संघ सक्रीय झाले आहेत. मुंबई इंडियन्सच्या संघाने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमुळे नेटकऱ्यांमध्ये वेगळीच चर्चा रंगली आहे. मुंबईच्या अधिकृत हॅण्डलवरुन पोस्ट केलेला व्हिडीओ पाहून संघात फूट पडल्याचं व्हिडीओमधूनच दिसत असल्याची शंका चाहत्यांनी उपस्थित केली आहे. 


काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल व्हिडीओमध्ये मुंबई इंडियन्सचे सर्व खेळाडू मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणांवर दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये संघाच्या मालकीण निता अंबानी आणि संघाचा मार्गदर्शक सचिन तेंडुलकरही दिसत आहे. व्हिडीओच्या शेवटच्या काही क्षणांमध्ये मैदानात उतरणारा संघ एकाच फ्रेममध्ये पोज देताना दिसत आहे. या शेवटच्या फोटोमध्ये रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या सोफ्यावर बसल्याचं दिसत आहे. मात्र या सोफ्यावर दोघे अगदी दोन टोकाला बसले आहेत. चाहत्यांनी या फोटोचा संबंध हार्दिक पंड्याची कर्णधार म्हणून नियुक्ती केल्यानंतर रोहित शर्मा आणि त्याचा चमू नाराज असल्याशी जोडली आहे. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...



या व्हिडीओमधील शेवटी संघ एकत्र दिसत असल्याचा फोटो व्हायरल झाला असून त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय.



अनेकांनी नोंदवलं मत


दोघे सोफ्यावर बसले असले तरी त्यांच्यात फारच अंतर असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. काहींनी ही बाब सकारात्कमरित्या घेताना मध्यभागी यंदाच्या आयपीएल चषकासाठी ठेवल्याची प्रतिक्रिया नोंदवली आहे तर अनेकांनी हा दूरावा संघातील स्थितीबद्दल बरंच काही सांगून जातो असं म्हटलं आहे. सोशल मीडियावर दोन्ही बाजूकडील प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. पाहूयात मोजक्या प्रतिक्रिया...


1)



2)



हार्दिकची निवड आणि नाराजी


दरम्यान, सोमवारी मुंबई झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये हार्दिक पंड्याने रोहितबरोबर बोलताना अवघडल्यासारखं वाटत नाही असं म्हटलं आहे. माझ्यात आणि रोहितमध्ये संवाद साधण्यात कोणताच अडथळा नाही. रोहितचा अनुभव आम्हाला फार फायद्याचा ठरणार असून तो कायमच मला पाठिंबा देत असल्याचं हार्दिकने आवर्जून नमूद केलं. या पर्वाच्या आधीच मुंबई इंडियन्सच्या संघाने कर्णधारपदी हार्दिक पंड्याला नियुक्त केल्याने मोठा वाद निर्माण झाला. मागील अनेक वर्षांपासून संघाचं नेतृत्व करणाऱ्या आणि 5 वेळे जेतेपद मिळवून देणाऱ्या रोहित शर्माऐवजी हार्दिकला अचानक कर्णधार घोषित केल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियापासून ते क्रिकेट वर्तुळातील दिग्गजांपर्यंत अनेकांनी यावर मतं मांडली. आता अगदी पर्व सुरु होण्याच्या तोंडावरही हार्दिकच्या निवडीवरुन टीका होताना आणि हार्दिक रोहितसारखी कामगिरी करु शकेल का यासंदर्भातील शंका उपस्थित केली जात आहे.