Cricket Viral Hilarious Video: क्रिकेटमध्ये ज्याप्रमाणे फलंदाजी आणि गोलंदाजी महत्त्वाची असते तसेच क्षेत्ररक्षणही फार महत्त्वाचे असते. त्यामुळेच कॅचेस विन मॅचेस असंही म्हटलं जातं. मैदानावर उतरणाऱ्या प्रत्येक खेळाडूला क्षेत्ररक्षण करावेच लागते. विरोधी संघाला कमीत कमी धावा करु देणं हे एकमेव ध्येय क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचं असतं. विशेष म्हणजे कोणी फलंदाज असतो तर कोणी गोलंदाज मात्र क्रिकेट टीममधील प्रत्येकजण हा एक क्षेत्ररक्षक असतो. असं असलं तरी प्रत्येकजण या नावाला जागेलच असं नाही.


फिल्डिंगदरम्यान गोंधळ केला अन्...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेटच्या मैदानावर फिल्डींग करताना होणारी गफलत आणि गडबड ही काही नवीन गोष्ट नाही. खरं तर क्षेत्ररक्षणामध्ये झेल पकडणे, थ्रो करणे, स्वत:ला झोकून देत चेंडू सीमारेषेला जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न असतो. यासाठी खेळाडू चपळ असणं आवश्यक असते. म्हणजेच झेल घेण्यासाठी खेळाडूला योग्य वेळी योग्य ठिकाणी असण्याबरोबरच चपळता दावणंही आवश्यक असतं. यामध्ये थोडी चूक झाली तरी विरोधी संघाच्या खात्यात आयत्या धावा जमा होतात. असाच काहीसा प्रकार सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये एका 40 हून अधिक वयोगटातील क्रिकेट स्पर्धेमधील व्यक्तीबरोबर घडला. खरं तर या व्यक्तीची चूक पाहून क्रिकेट समजणाऱ्या कोणालाही हसू आल्याशिवाय राहणार नाही. सोशल मीडियावर या व्हिडीओवर अनेक मजेदार प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहेत.


नेमकं घडलं काय...


पनवेलमधील प्रमोद स्मृती चषक स्पर्धेच्या स्थानिक सामन्यामधील हा व्हिडीओ आहे. रोडपाडी आणि पडघे नावाच्या संघांमधील सामन्यात हा प्रकार घडला. व्हिडीओवरुन हा सामना 40 हून अधिक वर्षांच्या वयोगटातील व्यक्तींचाच असल्याचं दिसून येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ हा रेकॉर्डेड टेलिकास्टमधील असून स्कोअरकार्डवरील माहितीमध्येही सामना 40 हून अधिक वर्ष वयोगटातील लोकांचा असल्याचं स्पष्ट होत आहे. फलंदाजाने फटका मारल्यानंतर चेंडू आपल्या दिशेनं येत असल्याचं पाहून फिल्डर तो झेल पकडण्यासाठी जातो. मात्र त्याला झेल पकडता येत नाही. त्यानंतर सिमारेषेकडे जाणाऱ्या बॉलचा पाठलाग करत चौकार अडवण्याचा प्रयत्न ही व्यक्ती करु लागते. बऱ्याच प्रयत्नानंतर ही व्यक्ती चेंडू आडवते. मात्र चेंडू अडवण्याच्या नादात खाली पडते. त्यानंतर जमिनीवरुन उठण्याच्या प्रयत्नात असतानाच ही व्यक्ती थ्रो करते मात्र चेंडू या व्यक्तीच्या पायाला लागून चौकार जातो. एवढी धडपड करुनही चौकार गेल्यानंतर ही व्यक्ती सीमारेषेजवळच पडून राहिलेली दिसते. 


1)



2)



हा व्हिडीओ पाहून क्रिकेट समजणाऱ्या कोणालाही हा काय वेडेपणा आहे असं वाटणं सहाजिक आहे. अशाच अर्थाच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिसून येत आहेत. अनेकांनी या व्यक्तीचे प्रयत्न दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉण्टी रोऱ्हड्सलाही लाजवतील असे असल्याची उपहासात्मक प्रतिक्रिया नोंदवली आहे. खरं तर जॉण्टी रोऱ्ह्डस हा एक उत्तम फिल्डर होता. त्याच्या अगदी उलट कामगिरी या व्यक्तीने केल्याने विरोधाभास दर्शवण्यासाठी लोक या व्यक्तीची जॉण्टीशी तुलना करत आहेत.