Mumbai Police : आयपीएलचे सामने सुरु असतानाच मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला मोठा धक्का बसला आहे. मुंबई पोलिसांनी क्रिकेटपटू हार्दिक आणि कृणाल पांड्याचा सावत्र भाऊ वैभव पांड्याला सुमारे 4 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वैभव पांड्यावर फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता वैभवच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, क्रिकेटपटू हार्दिक पांड्याच्या सावत्र भावाला बुधवारी क्रिकेटपटू आणि त्याच्या भावाची व्यवसायात फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. हार्दिकचा सावत्र भाऊ वैभव पंड्या (37) याने मुंबईतील पार्टनरशिप फर्ममधून सुमारे 4.3 कोटी रुपयांची हेराफेरी केली आहे. यामुळे हार्दिक आणि त्याचा भाऊ क्रुणाल यांचे नुकसान झाले, असे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.


नेमकं प्रकरण काय?


वैभव पांड्यावर फसवणुकीचा आरोप लावण्यात आला आहे. त्याच्यावर फसवणूक आणि फसवणूक केल्याचा आरोप आहे. 2021 मध्ये तिघांनी मिळून पॉलिमर व्यवसाय सुरू केला. भागीदारीच्या अटी अशा होत्या की क्रिकेटपटू आणि त्याचा भाऊ प्रत्येकी 40% भांडवल घालतील तर सावत्र भाऊ 20 टक्के घेऊन दैनंदिन कामकाज हाताळतील. नफा त्याच प्रमाणात वाटला जाणार होता.


वैभव पांड्याला पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. 2021 मध्ये तिघांनी मिळून पॉलिमर व्यवसाय सुरू केला. यामध्ये भागीदारीच्या अटी अशा होत्या की हार्दिक आणि क्रृणाल प्रत्येकी 40 टक्के भांडवल घालतील तर वैभव 20 टक्के भांडवल देऊन दैनंदिन कामकाज हाताळेल. तर नफासुद्धा याच प्रमाणात वाटला जाणार होता. पण भागीदारी कराराचे उल्लंघन करून हार्दिक आणि त्याच्या भावाला न कळवता वैभवने त्याच व्यवसायात दुसरी फर्म सुरु केली. या सगळ्यामध्ये, मूळ भागीदारीचा नफा कमी झाला, ज्यामुळे 3 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. वैभवने गुपचूपपणे त्याचा नफा 20 टक्क्यांवरून 33.3 टक्क्यांपर्यंत वाढवला, ज्यामुळे हार्दिक आणि त्याच्या भावाचे प्रचंड नुकसान झाले. वैभवने पार्टनरशिप फर्मच्या खात्यातून एक कोटी रुपये घेतले आणि लाखो रुपये स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर केले. विरोध केल्यास तुझं नाव बदनाम करेल अशीही धमकी वैभवने दिली होती.