मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी बॉलशी छेडछाड केली. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या तीन खेळाडूंच निलंबन करण्यात आलं. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरचं एक वर्षासाठी आणि कॅमरून बँक्रॉफ्टचं ९ महिन्यांसाठी निलंबन झालं. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ही कारवाई केली. याचबरोबर स्मिथला २ वर्ष तर डेव्हिड वॉर्नरला यापुढे कधीच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होता येणार नाही. पण २०१९ साली होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी हे तिन्ही खेळाडू निवडीसाठी पात्र ठरणार आहेत.


मुंबई पोलिसांचा नागरिकांना सल्ला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईच्या रस्त्यांवर आम्ही रोव्हिंग सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. त्यामुळे नियम पाळा आणि कॅमेरामध्ये कैद होऊ नका. कायद्याशी छेडछाड करु नका, असं ट्विट मुंबई पोलिसांनी केलं आहे. हे ट्विट करताना मुंबई पोलिसांनी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा बॉलशी छेडछाड करतानाचा आणि कॅमेराचा फोटो दाखवला आहे.