मुंबई : आयपीएलमधील 26 वा सामना मुंबई विरुद्ध लखनऊ होत आहे. या सामन्यात मुंबई पराभवाचा सिक्सर ठोकणार की विजयाचं पहिलं खातं उघडणार याकडे लक्ष लागलं आहे. मुंबईच्या पलटणने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लखनऊ टीमला पहिल्यांदा बॅटिंग करावी लागणार आहे. लखनऊ टीममध्ये एक बदल करण्यात आला. कृष्णप्पा गौतमच्या जागी मनीष पांडेला पुन्हा संधी देण्यात आली. आजच्या सामन्यात तो कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. 


मुंबई टीमने अर्जन तेंडुलकरला टीममध्ये खेळण्याची संधी दिली नाही. के एल राहुलची आयपीएलमधील 100 वा सामना आहे. 


मुंबई प्लेइंग इलेव्हन:  रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), डेवाल्ड ब्रेविस, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव, किरोन पोलार्ड, फॅबियन एलन, जयदेव उनादकट, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टाइमल मिल्स


लखनऊ प्लेइंग इलेव्हन:  केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), मनीष पांडे, दीपक हुड्डा,मार्कस स्टोइनिस, आयुष बदोनी, जेसन होल्डर, क्रुणाल पांड्या, दुष्मंथा चमीरा, अवेश खान, रवि बिश्नोई.