मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार आणि मुंबई टीमचं कर्णधारपद रोहित शर्माकडे आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात आयपीएलमध्ये मुंबईला ट्रॉफी मिळवून दिल्या आहेत. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबईला काही खास कामगिरी करता आली नाही. त्यामुळे टीम प्लेऑफमधून बाहेर पडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता मुंबई टीमची कमान टिळक वर्माकडे दिली जाऊ शकते असं भाकीत आकाश चोपडाने केलं आहे. टिळक वर्माने चांगली कामगिरी केली आणि त्याच्या हाती मुंबई टीमची कमान दिली जाऊ शकते असं भाकीत त्याने केलं आहे. 


CSK विरुद्धच्या विजयानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टिळक वर्मावर मोठा विधान केलं आहे. टिळक वर्माला टीम इंडियातून खेळण्याची संधी दिली जाणार आहे. रोहित शर्माने स्वत: मोठं विधान केलं. 


कठीण परिस्थितीत त्याची चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे माझ्या मते तो योग्य मार्गावर आहे. त्याला टीम इंडियातून खेळण्याची संधी मिळणार असल्याचे संकेत रोहित शर्माने दिले आहेत. 


टिळक वर्माने  26 टी 20 सामन्यात  715 केल्या आहेत. यामध्ये त्याने 5 अर्धशतक ठोकले. त्याने एका डावात सर्वाधिक 75 धावा केल्या आहेत. त्याची कामगिरी पाहता तो टी 20 वर्ल्ड कपसाठी देखील खेळू शकतो. दुसरीकडे मुंबईचं कर्णधारपद त्याच्याकडे दिलं जाण्याची शक्यता आहे की नाही यावर मात्र रोहितने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.