जयपूर : राजस्थानविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईनं टॉस जिंकला आहे. मुंबईचा कॅप्टन रोहित शर्मानं पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. बंगळुरूविरुद्धच्या मॅचमध्ये खेळलेली टीमच मुंबईनं मैदानात उतरवली आहे. आयपीएलमधल्या पहिल्या तीन मॅचमध्ये पराभव झाल्यानंतर बंगळुरूविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा विजय झाला होता. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई सहाव्या क्रमांकावर आहे. ४ मॅचमध्ये १ मॅच जिंकल्यामुळे मुंबईकडे २ पॉईंट्स आहेत. तर राजस्थानकडे ५ पैकी २ मॅच जिंकल्यामुळे ४ पॉईंट्स आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये राजस्थान सहाव्या क्रमांकावर आहे. ही मॅच जिंकली तर मुंबईची टीम पाचव्या क्रमांकावर जाईल.


मुंबईची टीम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूर्यकुमार यादव, एव्हीन लुईस, इशान किशन, रोहित शर्मा, कृणाल पांड्या, कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या, मिचेल मॅकलेनघन, मयंक मार्कंडे, जसप्रीत बुमराह, मुस्तफिझूर रहमान


राजस्थानची टीम


अजिंक्य रहाणे, हेनरिच क्लासीन, संजू सॅमसन, बेन स्टोक्स, जॉस बटलर, राहुल त्रिपाठी, कृष्णप्पा गौतम, जोफ्रा आर्चर, धवल कुलकर्णी, श्रेयस गोपाल, जयदेव उनाडकट