वर्ल्ड कपमध्ये 11 विकेट घेणाऱ्या या भारतीय बॉलरची क्रिकेटमधून निवृत्ती
नुकतीच त्याने आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केलीयं.
नवी दिल्ली : तुम्हाला 2011 चा वर्ल्ड कप आठवतोय ? टीम इंडियाच्या सर्वच प्लेअर्सने शानदान खेळ करत हा खिताब जिंकला होता. पण यामध्ये एका नावाचा उल्लेख प्रामुख्याने करावा लागेल. त्याने संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये आपल्या बॉलिंगने 11 विकेट घेत समोरच्या बॅट्समनला तंबूत पाठवलं आणि टीम इंडियाला विजया पर्यंत नेलं. मुनाफ पटेलने मैदानात ही जादू केली होती. पण आता त्याची ही जादू आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानावर दिसणार नाहीयं. नुकतीच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केलीयं.
आगामी दिवसांत होणाऱ्या टी 10 लीगमध्ये तो राजपूत टी 10 लीग मध्ये तो राजपूत टीममधून खेळताना दिसेल. क्रिकेट एक्सपर्ट किंवा अन्य कोणत्या रुपात तो दिसू शकतो पण क्रिकेटर म्हणून आता खेळताना दिसणार नाही.
टीम इंडियाच्या पेस बॉलिंगचा स्टार असलेल्या मुनाफने क्रिकेटच्या सर्वच फॉर्मेटमधून सन्यास घेतलायं. त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टवर चाहत्यांच्या मोठ्या प्रमाणात शुभेच्छा मिळताहेत.
मुनाफची कारकिर्द
मुनाफने एकूण 13 टेस्ट आणि 70 वन डे आणि 3 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 2011 च्या वर्ल्डकपमध्ये त्याचं योगदान खूप महत्त्वाचं राहिलंय.
त्यावेळी टीम इंडियाचे बॉलिंग कोच एरिक सिमंस यांनी मुनाफला 'अज्ञात योद्धा' म्हटलं होतं. पंजाबच्या मोहालीमध्ये मुनाफ 2006 मध्ये इंग्लंडविरूद्ध पहिली टेस्ट मॅच खेळला.