IND vs BAN Test Series : भारत आणि बांगलादेश यांच्यात टेस्ट मालिका खेळवली जाणार आहे. 19 सप्टेंबर रोजी पहिला सामना खेळवला जाईल. अशातच टेस्ट मालिका सुरू होण्यापूर्वी धक्कादायक माहिती समोर आली आहे. बांगलादेशचा माजी कॅप्टन आणि स्टार खेळाडू शाकिब अल हसन याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाकिबसोबतच अभिनेता फिरदौस अहमद यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे आता शेख हसिना यांनी देश सोडल्यानंतर आवामी लीगच्या नेत्यांना टार्गेट केलं जातं असल्याचं समोर आलं आहे. तुम्हाला माहिती नसेल तर शाकीब अल हसन हा बांगलादेशचा खासदार देखील आहे.


नेमकं प्रकरण काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंदोलनकर्ता रुबेल याच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये शाकीब अल हसन याच्या अडचणी वाढू शकतात. रुबेलने 5 ऑगस्ट रोजी अडबोरमधील रिंगरोडवर निषेध मोर्चात भाग घेतला होता. त्यावेळी  रुबेलच्या छातीत आणि पोटात गोळी लागली. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, परंतु 7 ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात तब्बल 500 अज्ञात लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये शाकीब अल हसनचा देखील समावेश आहे. 


शकीब भारताविरुद्ध खेळणार?


बांगलादेशचा माजी कॅप्टन शकीब अल हसन भारताविरुद्ध टेस्ट क्रिकेट खेळणार की नाही? असा सवाल विचारला जात होता. त्यावर बांगलादेशच्या मुख्य निवडकर्त्याने उत्तर दिलं होतं. बांगलादेशचे मुख्य निवडकर्ता गाझी अश्रफ हुसेन यांनी शाकिब भारतात कसोटी सामने खेळणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.


दरम्यान, शाकिब अल हसन 4 किंवा 15 ऑगस्टच्या आसपास संघात (पाकिस्तान मालिकेसाठी) सामील होण्याची अपेक्षा आहे आणि तो सर्व कसोटी सामने खेळेल, असं गाझी अश्रफ हुसेन यांनी म्हटलं होतं. अशातच आता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने शाकिब अल हसन भारताविरुद्ध खेळणार की नाही? असा सवाल विचारला जात आहे.