Musheer Khan : क्रिकेटच्या देवासमोर मुशीर खानचं शतक, सचिनचा रेकॉर्ड मोडताच वडिलांना भावना अनावर; पाहा Video
Musheer Khan breaks Sachin Tendulkar record : मुंबईचा युवा फलंदाज मुशीर खान याने क्रिकेटच्या देवासमोर त्याचा रेकॉर्ड ब्रेक केलाय. त्यानंतर वडिलांनी त्याची हिंमत वाढवली.
Ranji Trophy Final, Mumbai vs Vidharbh : टीम इंडियाचा स्टार युवा फलंदाज सरफराज खान याचा धाकटा भाऊ मुशीर खान (Musheer Khan Ton) याने रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये खणखणीत शतक ठोकलं आहे. रणजी ट्रॉफीचा फायनल सामना मुंबई आणि विदर्भ (Mumbai vs Vidharbh) यांच्यात खेळवला जातोय. अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये मुशीर खान याने धमाकेदार खेळी केली होती. त्यानंतर त्याला मुंबईच्या रणजी संघात जागा मिळाली. मुशीरने याच संधीचं सोनं करत फायनलमध्ये खणखणीत शतक ठोकलं आहे. कॅप्टन अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) बाद झाल्यानंतर मुशीरने ज्याप्रकारे पाय जमवले, ते पाहून सचिन (Sachin Tendulkar) देखील आश्चर्यचकित झाला. त्यावेळी मुशीरचे वडिल नौशाद खान (Naushad Khan) यांनी देखील लेकाचा उत्साह वाढवला.
मुशीरने मोडला सचिनचा रेकॉर्ड
विदर्भाविरुद्धच्या रणजी अंतिम सामन्यात मुशीरने शतक झळकावून सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. 29 वर्षांपूर्वी म्हणजे 1994/95 मध्ये सचिनने मुंबईकडून खेळताना रणजी फायनलमध्ये शतक झळकावलं होतं. त्यावेळी सचिनचं वय 21 वर्ष आणि 11 महिने होतं. आता मुशीरने 19 वर्ष आणि 14 दिवसात रणजी फायनल सामन्यात शतक ठोकलं आहे. त्यामुळे मुशीर खान आता रणजी ट्रॉफी फायनलमध्ये शतक झळकावणारा मुंबईचा सर्वात तरुण फलंदाज ठरलाय.
आपल्या लेकाची कामगिरी पाहण्यासाठी मुशीरचे वडील नौशाद खान यांनी उपस्थिती लावली होती. लेकाने अर्धशतक ठोकल्यावर वडीन नौशाद यांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या अन् मैदानात टिकून खेळ, असा सल्ला दिला. त्यावर.. मैदानात मी खेळत राहिल, असा संदेश मुशीरने हावभाव करत पाठवला. त्याचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.
मुंबई प्लेईंग ईलेव्हन : अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, भूपेन लालवानी, मुशीर खान, श्रेयस अय्यर, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शम्स मुलाणी, शार्दूल ठाकुर, तनुष कोटियन, धवल कुलकर्णी आणि तुषार देशपांडे.
विदर्भ प्लेईंग ईलेव्हन : अक्षय वाडकर (कॅप्टन आणि विकेटकीपर), अथर्व तायडे, ध्रुव शौरे, अमन मोखाडे, करुण नायर, यश राठोड, आदित्य सरवटे, उमेश यादव, हर्ष दुबे, यश ठाकुर आणि आदित्य ठाकरे.