Musheer Khan : टीम संकटात अन् धाकड्यानं ठोकलं खणखणीत शतक, थोरल्याचा आनंद गगनात मावेना; पाहा Video
Sarfaraz Khan Celebrate Musheer Khan century : स्टार युवा फलंदाज मुशीर खान याने इंडिया इंडिया ए संघाविरुद्ध (Duleep Trophy 2024) खणखणीत शतक ठोकलंय.
Duleep Trophy India A vs India B : दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेत इंडिया ए आणि इंडिया बी संघात सामना खेळवला जातोय. या सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर इंडिया ए संघाने मजबूत आघाडी घेतली आहे. इंडिया ए संघाने गोलंदाजीच्या जोरावर पहिला दिवस आपल्या खिशात घातला. मात्र, एक खेळाडू इंडिया ए समोर पाय रोवून उभा राहिला. त्याचं नाव मुशीर खान.. होय, सरफराज खानचा धाकटा भाऊ...! 19 वर्षाच्या मुशीरने गोलंदाजांची जोरदार धुलाई केली अन् संघाची लाज राखली.
सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंडिया बी संघाने 7 गडी बाद 202 धावा केल्या होत्या. आठव्या गड्यासाठी मुशीर खान आणि नवदीप सैनीने 212 चेंडूत 108 धावांची भागीदारी केल्याने इंडिया बी संघाने सुटकेचा श्वास घेतला. मुशीर खानने 227 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 105 धावा केल्या अन् संघाला समाधानकारक स्कोरवर पोहोचवलं. एकीकडे मुशीर एक बाजू सांभाळत असताना दुसऱ्या बाजूने फलंदाज झटपट बाद होत होते.
तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या मुशीरने संयमी खेळी केली अन् उसळी घेणाऱ्या पीचवर पाय रोवले. मुशीरने 227 बॉलचा सामना केला अन् 105 धावा केल्या. यावेळी त्याने 10 फोर अन् 2 खणखणीत सिक्स देखील मारले. मुशीरची खेळी संघासाठी फायद्याची ठरली. मुशीरच्या शतकानंतर मोठ्या भावाला म्हणजे सरफराज खानला आनंद अनावर झाला अन् त्याने जल्लोषात भावाचं कौतूक केलं. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झालाय.
पाहा Video
कॅप्टन अभिमन्यू ईश्वरन, यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, ऋषभ पंत आणि नितीश रेड्डू या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. पाच फलंदाजांना दुहेरी आकडा देखील गाठता आला नाही. मात्र, अखेरीस नवदीप सैनीने फलंदाजी करत मुशीरला साथ दिली अन् शुभमन गिलचा प्लॅन धुळीस मिळवला.
भारत ए (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल (कर्णधार), मयंक अग्रवाल, केएल राहुल, रियान पराग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिवम दुबे, तनुष कोटियन, कुलदीप यादव, आकाश दीप, आवेश खान, खलील अहमद.
भारत बी (प्लेइंग इलेव्हन): अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), मुशीर खान, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रविश्रीनिवासन साई किशोर, मुकेश कुमार, नवदीप सैनी, यश दयाल.