गुवाहाटी :  भारताविरूद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारतीय फलंदाजीला पाणी पाजले.  भारताची ही हालत ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फ याने केली. आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरचा दुसरा सामना खेळणाऱ्या या गोलंदाजाने भारतीय फलंदाजांची कंबर मोडली.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेसनने आपल्या चार ओव्हरमध्ये २१ धावा देऊन ४ विकेट घेतल्या. या कामगिरीसाठी त्याला मॅन ऑफ द मॅच किताब देण्यात आला. 


मॅचनंतर  तो म्हणाला की, टेस्ट क्रिकेट हा सर्वात मोठा पुरस्कार आहे. ऑस्ट्रेलियाच्या हिरव्या रंगाची टोपी परिधान करणे एक स्वप्न आहे आणि मलाही टेस्ट खेळायची आहे. टेस्ट खेळण्यासाठी सर्व काही करत आहे. 


रांचीमध्ये टी-२० सामन्यात पदार्पण केल्यावर त्याने फक्त एक ओव्हर टाकली होती. पण त्यावेळी काही चमक दाखवता आली नाही. पण दुसऱ्या सामन्यात रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली आणि मनीष पांडे यांना १५ चेंडूत बाद केले.