मुंबई : आयपीएलमध्ये पंजाब टीम प्लेऑफमध्ये पोहोचेल की नाही याबाबत संभ्रम आहे. पंजाबला 6 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. या मॅचमध्ये मिस्ट्री गर्लची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शशी धीमनला पंजाबची मिस्ट्री गर्ल म्हणून ओळलं जातं. ती सोशल मीडिया पेजसाठी अँकरिंग करते. पंजाबच्या सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओ किंवा मुलाखती येतात. त्यामध्ये शशी धीमन काम करते. 


तिने कगिसो रबाडा, लियाम लिविंगस्टोन आणि शिखर धवनची मुलाखत घेतली होती. सोशल मीडियावर तिची खूप चर्चा आहे. पंजाबच्या प्री आणि पोस्ट मॅच व्हिडीओमध्येही तिची चर्चा आहे. 



शशी स्टँड-अप-कॉमेडियनही आहे. ती गेल्या तीन-चार वर्षांपासून स्टँड-अप कॉमेडी करते. तिचे अनेक व्हिडीओही लोकप्रिय झाले.चंदिगडमध्ये राहणारी शशी धीमान पंजाबी आहे. पंजाबीमध्ये अनेक व्हिडीओ शूट करते. पंजाब आणि पंजाब टीमशी, चाहत्याशी आणि तिथल्या लोकांशी तिचं खास नातं जोडलं गेलं आहे. 


2020 पासून शशी मुंबई राहात होती. तिने काही स्टँड अप आणि कॉमेडी शोही केले. आयपीएल 2022 मध्ये पंजाब किंग्सच्या सोशल मीडियासाठी काम करताना दिसत आहे.