Tamil Nadu vs Railways : रणजी करंडक स्पर्धेच्या या मोसमात अनेक खेळाडूंची बॅट तळपल्याचं पहायला मिळतंय. अशातच चेन्नई सुपर किंग्जचा माजी फलंदाज एन जगदीसनने (N Jagadeesan) पहिल्या डावात रेल्वेविरुद्ध द्विशतक झळकावलं आहे. जगदीसनने 344 चेंडूंचा सामना करत 4 सिक्स अन् 11 चौकारांच्या मदतीने 208 धावांची धुंवाधार खेळी केली. त्यामुळे आता जगदीसनने सिलेक्टर्सला चोख प्रत्युत्तर दिलंय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मागील वर्षी झालेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये देखील 277 धावांची स्फोटक खेळी केली होती. अशातच आता त्याने रणजीमध्ये आपला दम दाखवून दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एस धोनीच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा भाग होता. मात्र धोनीच्या नेतृत्वाखाली या खेळाडूला संधी मिळाली नाही. त्यामुळे धोनीने जगदीसनचं करियर खराब केलंय, असा आरोप केला गेला होता. पण आता सीएसकेच्या माजी खेळाडूने द्विशतक झळकावून सर्वांनाच चकीत केलंय.


रणजी ट्रॉफी 2024 मध्ये तामिळनाडू विरुद्ध रेल्वे सामना खेळला जातोय. या सामन्यात तामिळनाडूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तामिळनाडूच्या सुरुवातीच्या विकेट लवकर पडल्या. पण नारायण जगदीसन एका टोकाला राहिला आणि त्याने रेल्वेच्या गोलंदाजीचा सामना केला. जगदीसनच्या खेळीमुळे तामिळनाडूचा संघ दुसऱ्यांदा सामन्यात 400 धावांचा टप्पा पार करण्यात यशस्वी ठरला. तमिलनाडू संघाने 7 गडी गमावून आत्तापर्यंत 416 धावा केल्या आहेत.



रेल्वे (प्लेइंग इलेव्हन): शिवम चौधरी, विवेक सिंग, प्रथम सिंग, निशांत कुशवाह, मोहम्मद सैफ, उपेंद्र यादव (w/c), साहब युवराज, युवराज सिंग, आकाश पांडे, कर्ण शर्मा, कुणाल यादव.


तामिळनाडू (प्लेइंग इलेव्हन): विमल खुमर, बी सचिन, बाबा इंद्रजित, विजय शंकर, रविश्रीनिवासन साई किशोर (C), एन जगदीसन (WK), संदीप वॉरियर, एम मोहम्मद, एस अजित राम, मोहम्मद अली, बूपथी कुमार.