मेरी कोमच्या कामगिरीवर नरेंद्र मोदींचे खास ट्विट....
पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेली भारतीय महिला बॉक्सिंगपटू मेरी कोमने आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये ४८ किलो वर्गात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे.
नवी दिल्ली : पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेली भारतीय महिला बॉक्सिंगपटू मेरी कोमने आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये ४८ किलो वर्गात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. मेरी कोमने उत्तर कोरियन प्रतिद्वंदी किम हयांग मी चा ५-० असा पराभव करत आपले स्वप्न साकारले. पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरणारी ही पहिली भारतीय महिला आहे. विशेष म्हणजे या पराक्रम तिने अवघ्या ३५ वर्षात केला आहे. तिला तीन मुले देखील आहेत.
तिच्या या पराक्रमाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेरी कोमचे अभिनंदन केले आहे. मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "एएसबीसी आशियाई परिसंघाचे महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये सुवर्णपदक मिळवल्याबद्दल मेरी कोमचे अभिनंदन. एम सी मैरी कॉम तुमच्या कामगिरीबद्दल भारताला अभिमान आहे."
२०१४ मध्ये झालेल्या आशियाई खेळांनंतर मेरी कोमचे हे पहिले आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक आहे.
खेळ मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी ट्विट केले की, "किती शानदार कामगिरी. अभिनंदन मेरी कोम. आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पाचव्यांदा सुवर्णपदक जिंकल्याबद्दल. तिरंगा नेहमी उंच ठेवा, चॅम्पियनशिप."