अभिनेत्री आणि मॉडेल नताशा स्टेनकोविक आणि क्रिकेटर हार्दिक पांड्या यांचा घटस्फोट होत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. या दरम्यान नताशाने शेअर केलेल्या इंस्टाग्राम पोस्टवर पुन्हा एकदा या दोघांमधील घटस्फोट चर्चेचा विषय ठरवला आहे. या व्हिडीओचा अर्थ असा आहे की, जीवनात कधी कठीण काळ आला तर अशावेळी निराश न होता परमेश्वरावर विश्वास ठेवायला हवा. तिची ही पोस्ट घटस्फोटांच्या चर्चांना आणखी दुजोरा देणारी आहे. चाहते देखील या व्हिडीओला नताशा-हार्दिकसोबत घटस्फोटाच्या चर्चांशी जोडत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नताशा स्टेनकोविक सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नताशाने नुकताच तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर कारमध्ये बसलेला एक व्हिडिओ शेअर केला आहे. ती म्हणाली, 'आज मला खरोखरच हे वाचण्यासाठी खूप उत्सुक आहे. ते मला माझ्या जीवनात ऐकण्याची अत्यंत गरज आहे. यामुळे मी माझ्यासोबत बायबल ठेवलं आहे. कारण हे प्रत्येकाने वाचायला हवं. 


पुढे नताशाने सांगितलं की, परमेश्वर जो कायमच तुमच्या पुढे चालत असतो. तो कायम तुमच्यासोबत राहिल. परमेश्वर तुम्हाला कधीच सोडत नाही. त्यामुळे कधी घाबरू नका किंवा निराशही होऊ नका. पण कधी हे विसरु नका की, परमेश्वर तुमच्यासोबत आहे. तुमच्या कोणत्या प्रसंगातून जाताय याचा तो विचार करत नाही कारण परमेश्वराला आधीच तो प्लान माहित असतो. 


नताशा आणि हार्दिक यांच्या घटस्फोटाच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. टीम इंडियाच्या T20 विश्वचषक विजयानंतरही नताशाने हार्दिकसाठी काहीही पोस्ट केले नाही. ज्यानंतर चाहते नताशाच्या पोस्टवर बारीक लक्ष ठेवून होते.  यापोस्टमुळे आता घटस्फोटाच्या अफवांना आणखी वेग आला.


हार्दिकसाठी कोणतीच पोस्ट नाही 


विश्वचषकातील ऐतिहासिक विजयानंतर हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविचने सोशल मीडियावर मौन बाळगल्याने त्यांच्या विभक्त होण्याच्या अफवांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. सहसा, नताशा तिच्या सोशल मीडियावर हार्दिकच्या विजयाबद्दल अभिनंदनाच्या पोस्ट शेअर करते, परंतु यावेळी तिच्याकडून हार्दिकच्या विश्वचषक विजयावर कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. अभिनेत्रीच्या या मौनाने चाहते आणि मीडियामध्ये खळबळ उडाली आहे.


हार्दिक पांड्याने 2020 मध्ये दुबईमध्ये नताशाला प्रपोज केले. त्यानंतर लॉकडाऊन दरम्यान दोघांनी लग्न केले. या जोडप्याने त्याच वर्षी आपल्या मुलाचे अगस्त्यचे स्वागत केले. गेल्या वर्षी त्यांनी उदयपूरमध्ये ख्रिश्चन आणि पारंपारिक हिंदू विधींनी पुनर्विवाह केला.