हार्दिकनेच दिला होता नताशाला गोलीगत धोका? पांड्याच्या एक्स वाईफला भावना अनावर; पोस्ट चर्चेत
Hardik pandya Natasa Stankovic Divorce : क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांनी घटस्फोट जाहीर केला होता. मात्र, अद्याप नताशा अजून या धक्क्यातून सावरलेली दिसत नाहीये.
Hardik pandya Cheated Natasa Stankovic : टीम इंडियाचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता. पत्नी नताशा स्टॅनकोविकसोबत घटस्फोट जाहीर केल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता. घटस्फोट जाहीर करण्याआधीच नताशा मुलगा अगस्त्यासोबत मायदेशी परतली. मात्र, नताशा सोशल मीडियावर अॅक्टिव असते. अशातच घटस्फोटानंतर नताशाच्या भावनांचा निचरा झाल्याचं पहायला मिळतंय. सोशल मीडियावर नताशाच्या मनातल्या भावना स्पष्ट झाल्याचं दिसतंय.
इन्टाग्रामवर आपण रिल्स स्क्रोल करत असतो आणि आवडत्या रिल्सला लाईक करत असतो, तसेच नताशा स्टॅनकोविकने देखील गेल्या काही दिवसात भावनिक रिल्स लाईक केल्या आहेत. तसेच काही फसवणुकीबद्दलच्या रिल्स देखील तिने लाईक केल्या आहेत. सोशल मीडियावर याचे स्क्रिनशॉट्स व्हायरल झाल्याचं पहायला मिळतंय. घटस्फोटानंतर नताशा नैराश्यातून बाहेर येऊ शकली नाहीये का? असा सवाल नेटकरी विचारत आहेत.
Natasa Stankovic Liked Reels About Cheating & Emotional Abuse: Apparently Hardik Cheated On Her, Leading To Divorce
byu/Unique_Ad4358 inInstaCelebsGossip
हार्दिक पांड्याने गेल्या महिन्यात एक संयुक्त निवेदन जारी केलं होतं. आम्ही 4 वर्षानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतलाय, असं पांड्याने पोस्टमध्ये म्हटलं होतं. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले आणि सर्वोत्तम दिलं, पण आम्ही आमच्या दोघांच्या हिताचा निर्णय घेतला, असं पांड्याने पोस्टमध्ये म्हटलं होतं. मात्र, नेमकी चुक कोणाची होती? असा प्रश्न सोशल मीडियावर चर्चेत होता. अशातच आता नताशाने पोस्ट लाईक केल्याने हार्दिकची चूक होती का? असा शंका देखील नेटकरी उपस्थित करतायेत.
दरम्यान, हार्दिकने 2020 मध्ये दुबईमध्ये नताशाला प्रपोज केलं होतं आणि 31 मे 2020 रोजी लॉकडाऊन दरम्यान दोघांनी लग्नगाठ बांधली होती. 30 जुलै 2020 रोजी नताशा आणि हार्दिकच्या आयुष्यात मुलगा अगस्त्या याचं आगमन झालं. परंतू गेल्या काही वर्षांपासून दोघांमधील मतभेद दिसून येत होते. त्यानंतर त्यांनी घटस्फोट जाहीर केला होता.