Naveen-ul-Haq: आयपीएलमधील (IPL 2023) कालचा सामना खूपच गाजला. लखनऊ सुपर जाएंट्स (Lucknow Super Giants) विरूद्ध रॉयल चॅलेंजर बंगळूरू (Royal Challengers Bangalore) यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये राडा झालेला पहायला मिळाला. यानंतर ट्विटरवर देखील चाहत्यांनी व्हिडीओ पोस्ट करत एकच गोंधळ केला. मात्र गंभीरशी भिडण्यापूर्वी कोहलीचं नवीन उल हक (Naveen-ul-Haq) शी वाजलं होतं. दरम्यान यानंतर आता नवीन उल हकने कोहलीचं नाव न घेता सोशल मीडियावर एक पोस्ट केलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवीन आणि विराट यांच्यामध्ये झालेला वाद इतका वाढला की, त्यानंतर कोहली आणि टीम इंडियाचा माजी खेळाडू गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यामध्येही वादंग माजला. दरम्यान मंगळवारी सकाळी विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट केली. यानंतर नवीन उल हक (Naveen-ul-Haq) मागे न हटता त्याला उद्देशून पोस्ट केलीये.


नवीन उल हकची ट्विटर पोस्ट चर्चेत


नवीन उल हक (Naveen-ul-Haq) हा अफगाणिस्तानचा खेळाडू असून



आयपीएलमध्ये तो लखनऊ सुपर जाएंट्सकडून खेळतो. रॉयल चॅलेंजर बंगळूरूविरूद्धच्या सामन्यात विराट कोहलीशी त्याचा वाद झाला. यानंतर नवीनने त्याच्या ट्विटरवरून एक पोस्ट केलीये. या पोस्टमध्ये नवीन म्हणतो, तुम्हाला तेच मिळतं, ज्याचे तुम्ही हकदार असता आणि असंच झालं पाहिजे आणि नेहमी असंच होतं.


नवीनच्या या पोस्टवरून असा अंदाज लावण्यात येतोय की, नवीनचं हे ट्विट विराटला उद्देशून आहे. दरम्यान दोन्ही खेळाडूंची हातमिळवणी झाल्यानंतर दोघांमधील वाद संपल्याचं मानलं जात होतं. मात्र विराट आणि नवीन या दोघांनी केलेल्या सोशल मीडिया पोस्टवरून वाद अजून शमला नसल्याचं दिसतंय. 


विराट कोहलीची सोशल मीडियावर पोस्ट


मंगळवारी सकाळी विराट कोहलीने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट केलीये. यामध्ये त्याने त्याची भूमिका मांडलीये. "आपण जे काही ऐकतो ते मत असतं, तथ्य नाही. आपण जे काही पाहतो ते एक दृष्टीकोनातून असते पण ते सत्य नसते," असा  Marcus Aurelius यांचा कोट विराटने स्टोरीवर पोस्ट केला आहे. विराट आणि गंभीर यांच्या वादानंतर ही पहिली प्रतिक्रिया विराटची होती.