INDvsSL :रोहित शर्माने सांगितले भारताच्या पराभवाचे महत्त्वाचे कारण
भारतीय क्रिकेट संघाला निडास ट्रॉफीसाठी श्रीलंकेविरूद्ध सुरू असलेल्या मालिकेतील पहिलाच सामना भारताने गमावला. या पराभवाचे महत्वाचे कारण भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने प्रसारमाध्यमांसमोर सांगितले.
कोलंबो : भारतीय क्रिकेट संघाला निडास ट्रॉफीसाठी श्रीलंकेविरूद्ध सुरू असलेल्या मालिकेतील पहिलाच सामना भारताने गमावला. या पराभवाचे महत्वाचे कारण भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने प्रसारमाध्यमांसमोर सांगितले.
पुढच्या वेळी चांगली कामगिरी करू
रोहित शर्माने प्रसारमाध्यमांशी बोलताना पुढच्या सामन्यात भारतीय संघ दमदार पुनरागमन करेल असा आशावाद व्यक्त केला. पुढे बोलाताना रोहित म्हणाला, आमच्या खेळाडूंनी खूप चांगला प्रयत्न केला. पण, कधीकधी परिस्थिती आपल्या सोबत नसते. आम्ही जी रणनिती आखील ती फारशी प्रभावी ठरली नाही. आम्ही आमच्या चुकीमुळे पराभूत झालो. या काळात गोलंदाजी अधिक प्रभावी होणे गरजेचे आहे, असेही रोहित म्हणाला.
खेळाडूंकडे अनुभव कमी
दरम्यान, 'कोलंबोमध्ये भारतीय खेळाडूंकडे प्रदीर्घ अनुभव नसने हे सुद्धा भारतीय संघाच्या पराभवाचे प्रमुख कारण आहे. आता असा दावा केला जाऊ शकतो की, संघातील सर्व खेळाडू हे आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले आहेत. त्यांच्याकडे अनुभव आहे. पण, काही असले तरी, आम्ही पुढच्या सामन्यात आम्ही आमची कामगिरी सुधारू', असेही रोहित शर्माने सांगितले.