वजन कमी करण्यासाठी खेळला आणि आज बनलाय जगजेत्ता, फोटोतल्या `या` मुलाला ओळखलात का?
Neeraj Chopra Success Story: नीरजचा जन्म गरीब कुटुंबातील आहे. त्यामुळे त्याचा इथपर्यंत येण्याचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. त्याचा 17 सदस्यांचा एकत्र परिवार आहे.
Neeraj Chopra Success Story: केवळ वाढलेले वजन कमी करणे हात त्याचा हेतू होता.यासाठी घरचे मागे लागले होते. आणि तो खेळाकडे वळला. ते खेळू लागला, मेहनत घेऊ लागला. खेळाला त्याने गांभीर्याने घेतले. खूप मेहनत केली. खडतर परिस्थितीवर मात केली आणि आज तो जगजेत्ता बनलाय. ही कहाणी आहे भारताच्या नीरज चोप्रा याची त्याने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. नीरजने पहिला थ्रो फाऊल केला होता, पण दुसऱ्या थ्रोमध्ये त्याने 88.17 मीटर अंतरावर भालाफेक करून सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. विशेष म्हणजे संपूर्ण सामन्यात कोणत्याही खेळाडूला यापेक्षा पुढे भालाफेक करता आली नाही. सुरुवातीच्या काळात फक्त यूट्यूबवर प्रशिक्षण घेणाऱ्या नीरजने आज जगजेत्ता होण्यापर्यंतचा प्रवास केला आहे.
नीरजचा जन्म गरीब कुटुंबातील आहे. त्यामुळे त्याचा इथपर्यंत येण्याचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. त्याचा 17 सदस्यांचा एकत्र परिवार आहे. सर्वांच्या गरजा पूर्ण होण्याइतकी त्यांची आर्थिक परिस्थिती नव्हती. पण नीरजने आपल्या कामगिरीच्या जोरावर संपूर्ण कुटुंबाची प्रतिष्ठा वाढवली. त्याने आपल्या कारकिर्दीत भविष्यासाठी अनेक मार्ग खुले केले आहेत. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही नीरजने मोठ्या कष्टाने भालाफेकसाठी भाला विकत घेतला होता. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दिसणारा भाला दीड लाखात येतो. तर नीरजने पहिला विकत घेतलेला भाला अवघ्या 7 हजार रुपयांचा होता. या भाल्याने नीरजने आपल्या करिअरला सुरुवात केली. नीरजने भाला फेकण्याचा सराव सुरू केली. पण त्याच्या सुवर्णपदकी कामगिरीने आज नीरजच्या भाला फेकीचे जगभरातून कौतुक होत आहे.
भालाफेकने वेधून घेतले लक्ष
नीरज लहानपणापासूनच खूप वजनदार होता. त्यामुळे खेळ खेळून वजन कमी करण्याचा सल्ला त्याच्या वडील आणि काकांनी दिला. त्यानंतर नीरजने पानिपतच्या शिवाजी स्टेडियममध्ये विविध खेळ खेळून वजन कमी करण्यास सुरुवात केली. याच स्टेडियममध्ये नीरजने अनेक खेळाडूंना भाला फेकताना पाहिलं होतं. त्यावेळी गंमत म्हणून त्यानेही प्रयत्न करण्याचा विचार केला आणि पूर्ण ताकदीनिशी भाला फेकला. त्यावेळी नीरजने फेकलेला भाला पाहून तिथले सर्व खेळाडू आश्चर्यचकित झाले. नीरजने वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी 25 मीटरपेक्षा जास्त अंतरावर भालाफेक केली होती. यावेळी त्याचे कौतुक झाले आणि तेव्हापासून भालाफेकची त्याची आवड जागृत झाली.
युट्यूबच्या मदतीने घेतले प्रशिक्षण
नीरज चोप्राने आज देशासह जगभरातील नागरिकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले आहे. असे असले तरी सुरुवातीच्या काळात त्याच्याकडे कोणीच प्रशिक्षक नव्हता ही वस्तुस्थिती आहे. या खेळाकडे जेव्हा त्याची आवड वाढली तेव्हा तो दररोज किमान 7-8 तास सराव करत राहिला. थ्रोचे योग्य माध्यम समजून घेण्यासाठी त्यांने युट्युबचा आधार घेतला. दररोज युट्यूबरील व्हिडिओ पाहून कामगिरी सुधारण्याचा प्रयत्न तो करु लागला. हळूहळू खेळाकडे वाटचाल करत त्याने यमुनानगरमध्ये भालाफेकीचे प्रशिक्षण सुरू केले. तेव्हापासून नीरजने यशाच्या शिखरावर चढण्यास सुरुवात केली. आता त्याने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 चा सुवर्णपदक विजेता बनून इतिहास रचला आहे.