Women World Boxing Championship 2023: नीतू घंघास (Neetu Ghanghas) म्हणजे भारताची उगवती बॉक्सिंग (Boxer) स्टार. नीतूने दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर सुरू असलेल्या महिला जागतिक चॅम्पियनशिपची अंतिम फेरीत (Boxing Championship Final) दणदणीत विजय मिळवला आहे. मंगोलियाच्या लुत्सेखान अल्तांटसेगचा (Lutsekhan Altantseg) पराभव. नीतूने हा फायनलचा सामना 5-0 ने जिंकला आहे. अल्तांटसेगचा पराभव करून नीतूने सुवर्णपदकाला गवासणी घातली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नीतू (Neetu Ghanghas) तशी आक्रमक बॉक्सर...नीतूने पहिल्या फेरीपासून आक्रमक सुरुवात केली. संपूर्ण तीन मिनिटे आपला दबदबा कायम राखला. त्याचा नीतूला मिळाला. अंपायरने पाच पाईंट देत नीतूला विजयी घोषित केलं.  दुसऱ्या फेरीत, मंगोलियन मंगोलियाच्या लुत्सेखान अल्तांटसेगने नीतूला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, नीतूला त्याला देखील योग्य पद्घतीने टॅकल केलं आणि पाईंट घेऊ दिला नाही.


आणखी वाचा - Virender Sehwag: "तिहेरी शतक हुकल्यानंतर जेवढा मला राग आला नाही तेवढा...", जेव्हा सेहवागने Virat Kohli ला झाप झाप झापलं!


फक्त 22 वर्षाच्या नीतूने दुसऱ्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये (WBC 2023) भाग घेतला होता. पहिल्यांदा तिला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. गतवर्षी कझाकस्तानच्या अलुआ बाल्किबेकोवाने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतून बाहेर काढलं होतं. त्याचा बदला नीतूने घेतला आहे. उपांत्य फेरीत कझाकस्तानच्या अलुआ बाल्किबेकोवाला धुळ चारली.


पाहा तो क्षण (VIDEO)



दरम्यान, चार भारतीय बॉक्सर महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत (Women World Boxing Championship Final 2023) पोहोचल्या आहेत. गेल्या वेळची विश्वविजेती निखत जरीनचा देखील यात समावेश आहे. तिचा सामना आता येत्या रविवारी आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक जिंकणाऱ्या व्हिएतनामच्या गुयेन थी टॅम हिच्याशी होणार आहे. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.