India vs England 3rd T20i: टीम इंडियाच्या सूर्यकुमार यादवला T20 चा बादशाह म्हटले जाते. या फॉरमॅटमध्ये सूर्या शतकानुशतके त्याचा बेस्ट पर्फोमन्स करताना दिसला आहे. पण कर्णधारपद मिळाल्यानंतर सूर्याची  बॅट गंजल्यासारखी वाटत होती. सूर्या इंग्लंडविरुद्ध सलग तीन वेळा फ्लॉप ठरल्यानंतर टी-20 कर्णधार ट्रोल आर्मीला बळी पडला आहे. ज्या फॉरमॅटचा तो बादशहा होता आता त्याला त्याचमुळे ट्रोल होताना दिसत आहे. ट्रोलर्सनी सूर्याची अनेक प्रकारे खिल्ली उडवली आहे.


तिसऱ्या T20 सामन्यात भारताचा पराभव 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसऱ्या सामन्यात टिळक वर्मा संकटमोचक झाला. तिसऱ्या सामन्यात सलामीवीर बाद झाल्यानंतर संपूर्ण जबाबदारी कर्णधार सूर्यावर आली. मात्र पुन्हा एकदा तो 14 धावा करून बाद झाला.  नियमित कर्णधार झाल्यानंतर त्याच्या फॉर्ममध्ये घसरण झाली असल्याचे दिसून आले. 


ट्रोल आर्मीला बळी पडला सूर्या 


सलग तीन सामन्यांमध्ये सूर्याच्या खराब कामगिरीनंतर ट्रोल आर्मीने त्याच्यावर हल्लाबोल केला आहे. सूर्यकुमार यादवला 360 डिग्री प्लेअर म्हणतात. पण एका यूजरने लिहिले की, 'जे डिव्हिलियर्ससोबत त्याची तुलना करतात त्यांनी स्वतःला 360 वेळा कानाखाली मारावी.' त्याचप्रमाणे इतर ट्रोलर्सही  सूर्याला लक्ष्य करताना दिसले.


 





कसा होता पर्फोमन्स?


सूर्यकुमार यादवने आपल्या कर्णधारपदाने सर्वांना प्रभावित केले आहे. त्याने त्याची कर्णधारपदाची धुरा उत्तमपणे सांभाळी आहे. पण त्याच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर त्याने 13 सामन्यात 21.33 च्या सरासरीने केवळ 256 धावा केल्या आहेत. या घसरणीमुळे त्याच्या एकूण T20 आकड्यांवर परिणाम झाला असून त्याची फलंदाजी सरासरी 40 च्या खाली गेली आहे. 81 T20 मध्ये, त्याने 167.70 च्या स्ट्राइक रेटसह 39.33 च्या सरासरीने 2,596 धावा केल्या आहेत. त्याने चार शतके आणि 21 अर्धशतके केली आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या 117 आहे.