पाकिस्तानी टीमचा Coach न होण्यासंदर्भातील निर्णयावर Wasim Akram म्हणाला, `शिव्या...`
Wasim Akram On Pakistan Team Coaching: एका मुलाखतीमध्ये वसिम अक्रमने पाकिस्तान क्रिकेटसंदर्भात मनमोकळेपणे आपली मतं व्यक्त करताना हे विधान केलं आहे. त्याने पाकिस्तानी कर्णधाराबद्दलही भाष्य केलं.
Wasim Akram says Never considered coaching Pakistan team: पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमने (Wasim Akram) पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासंदर्भात विधान केलं आहे. पाकिस्तानी संघाचे प्रशिक्षक (Pakistan team Coach) आणि कर्णधारावर होणारी टीका, त्यांच्याशी केली जाणारी गैरवर्तवणूक आणि त्यांच्या प्रती असलेला द्वेष पाहूनच आपण कधी मुख्य प्रशिक्षक होण्याचा विचार केला नाही, असं अक्रमने म्हटलं आहे. संघ चांगला खेळत नसेल आणि टीका होत असेल तर हरकत नाही असं सांगतानाच अक्रमने पाकिस्तानी संघाचा कर्णधार आणि प्रशिक्षकांना चाहत्यांकडून शिव्या दिल्या जातात असंही म्हटलं. अशाप्रकारचा शिवीगाळ सहन करता येणार नाही असंही अक्रम म्हणाला.
सोशल मीडियाचा केला उल्लेख
स्विंगचा सुल्तान अशी ओळख असलेल्या अक्रमने पाकिस्तानी प्रसारमाध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीमध्ये हे विधान केलं आहे. आपल्या देशामध्ये कर्णधार आणि प्रशिक्षकाला चुकीचा वागणूक दिली जाते. कधी कधी त्यांना द्वेषाचाही समाना करावा लागतो. मला नाही वाटत की मी या साऱ्यासाठी तयार आहे. माझ्यामध्ये सहनशीलता फार कमी आहे. खास करुन सोशल मीडियाबद्दल बोलायचं झालं तर मी अशाप्रकारची मर्यादा सोडून केलेली टीका फार सहन करु शकत नाही. सोशल मीडियावर तर केवळ नकारात्मक प्रतिक्रिया नोंदवल्या जातात, असंही अक्रम म्हणाला.
बाहेरचा कोच कशाला?
पाकिस्तान क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच पीसीबीने मिकी ऑर्थरला प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्याच्या निर्णयावरुन अनेक माजी क्रिकेटपटूंनी टीका केली आहे. माजी मुख्य सिलेक्टर आणि कर्णधार शाहिद आफ्रिदीने केवळ बाहेरच्या देशांमधील व्यक्तीलाच प्रशिक्षक म्हणून का नेमलं जात? असा प्रश्न उपस्थित केला आहे. आपल्या देशामध्येही असे अनेक लोक आहेत जे प्रशिक्षक होऊ शकतात असं आफ्रिदी म्हणाला.
नक्की वाचा >> Pakistan Cricket Team : एका ओव्हरमध्ये 17 बॉल, 7 No Ball, 4 वाइड टाकणारा गोलंदाज निवडणार पाकिस्तानी टीम
बाबर आझमला पर्याय कोण?
वसीम अक्रमने कर्णधारपदासंदर्भात भाष्य करताना पीसीबीने बाबार आझमला कर्णधारपदावरुन काढू नये असा सल्ला दिला आहे. बाबरला कर्णधारपदावरुन काढल्यास ती मोठी चूक ठरेल असं सांगतानाच अक्रमने याचा काहीही फायदा होणार नाही असंही म्हटलं आहे. "आपल्याकडे काय पर्याय आहे? आपण नीट विचार केला तर बाबरच उत्तम पर्याय आहे. तो तरुण आहे आणि कर्णधार म्हणून त्यालाच कायम ठेवणं फायद्याचं ठरेल. कोणीच जन्मापासून कर्णधार किंवा लिडर नसतो. या साऱ्या गोष्टी वेळेनुसार आणि अनुभवाने शिकता येतात," असं अक्रम म्हणाला.