Team India Chief Selector: निवडसमितीच्या अध्यक्षपदी कोणाची लागणार वर्णी? `या` माजी खेळाडूचं नाव चर्चेत!
टी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 World cup) पदरी पडलेल्या पराभवानंतर टीमच्या सिलेक्शनवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यानंतर बीसीसीआयने ही अॅक्शन घेतली. त्यामुळे आता पुन्हा प्रश्न उपस्थित केला जातोय की, पुढच्या सिलेक्शन टीममध्ये कोणाचा समावेश असणार आहे?
Team India Chief Selector: बीसीसीआयने (BCCI) शुक्रवारी संध्याकाळी मोठा निर्णय घेतला. बीसीसीआयने सिलेक्शन कमिटी (National Selectors) बरखास्त केलीये. टी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 World cup) पदरी पडलेल्या पराभवानंतर टीमच्या सिलेक्शनवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यानंतर बीसीसीआयने ही अॅक्शन घेतली. त्यामुळे आता पुन्हा प्रश्न उपस्थित केला जातोय की, पुढच्या सिलेक्शन टीममध्ये कोणाचा समावेश असणार आहे?
रिपोर्ट्सनुसार, टीम इंडिययाचा माजी खेळाडू अजित आगरकर (Ajit Agarkar) नवे निवड समितीच्या अध्यक्षपदाच्या रेसममध्ये आहे. मुख्य म्हणजे अजित आगरकर यांनी यापूर्वीही यासाठी इच्छूक असल्याचं म्हटलं होतं. यासाठी त्यांनी अर्जही केला होता आणि त्यांना ही संधी मिळाली नाही. मात्र आता परिस्थिती पाहता त्यांना ही संधी मिळण्याची शक्यता आहे.
इनसाईड स्पोर्टने दिलेल्या माहितीनुसार, अजित आगरकर यांच्याशी याविषयी काहीही बातचीत होऊ शकलेली नाही. ते जर या पदासाठी अर्ज करू इच्छित असतील तर ही संपूर्णपणे त्यांची चॉईस असेल. गेल्यावेळी ते अध्यक्षपदाच्या फार जवळ होते, मात्र त्यांना संधी मिळाली नाही. मुख्य म्हणजे ते युवा असून त्यांच्याकडे तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळण्याचा अनुभव आहे.
बीसीसीआयने सर्व निवडकर्त्यांची (National Selectors) हकालपट्टी केली आहे. तसंच नवीन अर्ज मागवले आहेत. बीसीसीआयने यासंदर्भात एक ट्विट करत ही माहिती दिली आहे. चेतन शर्मा (Chetan Sharma) यांच्या नेतृत्वातील निवड समितीच्या सर्व सदस्यांची हकालपट्टी करण्यात आली असून सर्व चार जागांसाठी नव्याने अर्ज मागवले आहेत. नवीन जागांवर नियुक्ती होईलपर्यंत चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीच काम पाहाणार आहे.
निवड समितीत कोण होतं?
चेतन शर्मा (उत्तर विभाग) यांच्याबरोबर हरविंदर सिंह (मध्य विभाग), सुनील जोशी (दक्षिण विभाग) आणि देबांशीष मोहंती (पूर्व विभाग) यांचा निवड समितीत समावेश होता. यांच्यातील काही सदस्यांची नियुक्ती 2020 मध्ये करण्यात आली होती.
बीसीसीआयने मागवले अर्ज
बीसीसाआयने आपल्या ट्विटमध्ये राष्ट्रीय निवड समितीच्या चार जागांसाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2020 आहे.