New Controversy Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Instagram Story: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहने शेअर केलेल्या एका इन्स्टाग्राम स्टोरीमुळे चांगलाच वाद निर्माण झाला आहे. राफामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी प्रार्थना करा, अशा अर्थाची पोस्ट रितिकाने केली होती. राफामधील नागरिकांप्रती रोहितच्या पत्नीने सहानुभूती दर्शवली होती. मात्र यानंतर अनेकजण हात धुवून तिच्या मागे लागले आहे. रितिकाला ट्रोल करण्यात आल्याने तिने ही इन्स्टाग्राम स्टोरी डिलीट केली आहे. 


नेमकं प्रकरण काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी सकाळी सोशल मीडियावर राफा शब्द ट्रेण्ड करताना दिसला. राफा शब्द गाझामध्ये होत असलेले हवाई हल्ले आणि त्यामध्ये होणाऱ्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर ट्रेण्ड होत आहे. राफामधील 14 लाख पॅलेस्टिनी नागरिक शरण येण्यासंदर्भात विनंती करत आहे. जगभरातील अनेक सेलिब्रिटींबरोबरच नामवंत व्यक्तींनी गाझामध्ये राहणाऱ्या पॅलेस्टिनी नागरिकांचं समर्थन केलं आहे. रोहितची पत्नी रितिकानेही पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ पोस्ट केली होती. मात्र यावरुन तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं.


हिंदूंचा उल्लेख करत नोंदवला आक्षेप


सोशल मीडियावर रितिकाबरोबरच भारतीय कर्णधार रोहित शर्मालाही ट्रोल करण्यात आलं आहे. अनेकांनी रितिकावर निशाणा साधला आहे. हे लोक पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये हिंदूंविरोधात होत असलेल्या हिंसाचारासंदर्भात गप्प राहतात, मात्र पॅलेस्टाईनमधील घटनांमुळे व्यथित होतात, अशा शब्दांमध्ये काहींनी आक्षेप नोंदवला आहे.


रितिकाने डिलीट केली स्टोरी


रितिका सोशल मीडियावर फारच सक्रीय आहे. अनेक सामाजिक मुद्द्यावर ती उघडपणे भाष्य करते. राफामधील घडामोडींनंतर तेथील लोकांसाठी तिने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली होती. खरं तर हे एक इन्स्टाग्राम स्टोरी पॅम्पलेट असून ते रितिकाने शेअर केलं होतं. मात्र मोठ्याप्रमाणात ट्रोलिंग झाल्यानंतर तिने ही स्टोरी डिलीट केली. दक्षिण गाझामधील राफामध्ये इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमुळे आग लागून 45 जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व लोक पॅलेस्टाईनमधून विस्थापित होऊन गाझामध्ये स्थायिक होण्यासाठी आळे होते. या हल्ल्यावरुन इस्रायलवर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे. 



2)



3)



4)



5)



रोहित सध्या अमेरिकेत


सध्या रोहित शर्मा टी-20 वर्ल्डकपसाठी अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. तो यंदाच्या टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे.