मुंबई : क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड रोज बनतात आणि तुटतात. काही रेकॉर्ड चांगले असतात तर काही शोभणार नाही असे असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेटमध्ये कधी कोणता रेकॉर्ड बनेल हे कोणीच सांगू शकत नाही. असाच एक रेकॉर्ड बनलाय ते म्हणजे संपूर्ण संघ फक्त २ रनवर ऑलआऊट होण्याचा.


९ फलंदाज शुन्यावर आऊट


संपूर्ण संघ हा फक्त २ रनवर आऊट झाला. त्या २ रनपैकी एक रन देखील एक्ट्रा होता आणि १ रन एका फलंदाजाने केला होता. बाकी सर्व ९ खेळाडू शुन्य रनवर माघारी परतले.


क्रिकेटमधला कारनामा


केरळमध्ये सुरु असलेल्या बीसीसीआय अंडर १९ महिला क्रिकेटमध्ये हा रेकॉर्ड बनला आहे. नागालँड अंडर -19 महिला क्रिकेट संघ हा दोन धावांवर बाद झाला. केरळमधील गुंटूर येथील जेकेसी कॉलेज मैदानावर बीसीसीआय अंडर -19 एकदिवसीय सुपर लीग सामना खेळवण्यात आला.


१७ ओव्हरमध्ये फक्त २ रन


नागालँडने या दोन धावा 17 ओव्हरमध्ये केला. जेव्हा केरळचा संघ खेळण्यासाठी आला तेव्हा पहिल्याच व्हाईट बॉलवर फोर गेला आणि केरळ संघ जिंकला.


सर्वात कमी बॉलमध्ये विजयाचा विक्रम


केरळ संघाने सर्वात कमी चेंडूत विजय मिळवण्याचा विक्रम केला आहे. त्याआधी, ऑगस्ट 2006 मध्ये एशियन क्रिकेट परिषदेच्या (एसीसी) चषक सामन्यात नेपाळच्या संघाने म्यानमार येथे झालेला सामना २ बॉलमध्ये जिंकला होता. तेव्हा म्यानमारची टीम १० रनवर ऑलआऊट झाली होती.