T20 World Cup 2024, New York Pitch Controversy: गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा लागलेल्या टी-20 वर्ल्डकपला सुरुवात झाली आहे. मात्र टी-20 वर्ल्डकपमध्ये संघ आणि खेळाडूंच्या कामगिरीपेक्षा खेळपट्टीने सर्वाधिक लक्ष वेधून घेतंल आहे. याचं कारण ही खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल नसून त्यांना खेळणं फार कठीण जात आहे. भारत आणि आयर्लंडमधील सामन्यादरम्यान हे प्रकर्षाने जाणवलं. चेंडू उसळी घेत असल्याने रोहित शर्मा आणि ऋषभ पंत जायबंदीही झाले होते. रोहित शर्माला जखमी झाल्याने मैदान सोडावं लागलं. यानंतर चाहते खेळपट्टीवरुन संताप व्यक्त करत आहेत. अनेक माजी क्रिकेटर्सनी यावर परखड मत मांडलं असून आययीसीवर कठोर शब्दांत टीका केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचा माजी जलदगती गोलंदाज इरफान पठाणने खेळपट्टीवरुन आयसीसीवर टीका केली आहे. इरफानने समालोचन करताना म्हटलं की, "ही खेळपट्टी फार खराब आहे. जर अशी खेळपट्टी भारतात असती तर त्यावर पुन्हा सामना झाला नसता. आयसीसीने यावर आधी काही सामने खेळवायला हवे होते. अशा खेळपट्टींवर थेट सामने खेळवणं चुकीचं आहे".




इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकल वॉनने तर ही खेळपट्टी भयानक असल्याचं म्हटलं आहे. मायकल वॉनने एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "हे भयानक आहे. अमेरिकेत खेळाला प्रोत्साहन देण्याचा हा प्रयत्न चांगला आहे मला हे आवडंल आहे. पण खेळाडूंनी न्यूयॉर्कमधील अशा वाईट खेळपट्टीवर खेळणं अस्विकार्य आहे. तुम्ही वर्ल्डकपमध्ये जागा बनवण्यासाठी इतकी मेहनत करा आणि तुम्हाला अशा खेळपट्टीवर खेळावं लागतं".



मायकल वॉर्न याच्यासह हर्षा भोगले यांनाही पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की, "खेळपट्टींचं काही तरी करावं लागेल. या खेळपट्टीवर भारत-पाकिस्तान सामन्याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही". तसंच भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू मोहम्मद कैफने अमेरिकेत क्रिकेट खेळण्यासाठी चांगली जाहिरात नाही असं म्हटलं आहे. तसंच रोहित शर्माने या खेळपट्टीवर अर्धशतक ठोकल्याबद्दल कौतुकही केलं. 



मोहम्मद कैफने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "रोहित शर्माच्या अर्धशतकासाठी टाळ्या. न्यूयॉर्क सहजपणे जगातील सर्वात धोकादायक खेळपट्टी आहे. अमेरिकेतील क्रिकेटसाठी ही चांगली जाहिरात नाही".