T20 World Cup 2022: टीम इंडिया सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडशी भिडणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
टीम इंडियाचा सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडशी सामना होणार का? पॉईंटस टेबलचं गणित काय?
पर्थ : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) उपांत्य फेरीत पोहोचणारा न्यूझीलंड (New Zealand) हा पहिला संघ ठरला आहे. शुक्रवारी न्यूझीलंडने आयर्लंडचा (Ireland) 35 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. या स्पर्धेतील न्यूझीलंडचा हा तिसरा विजय आहे, त्यामुळे तो ग्रुप 1 मध्ये अव्वल ठरला आहे. या ग्रुपमध्ये न्यूझीलंडचा नेट रन रेट इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत चांगला आहे. म्हणजेच अशा स्थितीत न्यूझीलंडचे ग्रुप 1 मध्ये अव्वल स्थान निश्चित आहे. तर ग्रुप 2 मध्ये टीम इंडियाने (Team India) झिम्बाब्वेला पराभूत केले तर ते देखील टॉपवर येतील. आणि अशाप्रकारे दोन्ही गटातील अव्वल संघाचा म्हणजेच भारताला उपांत्य फेरीत न्यूझीलंडशी सामना करावा लागणार नाही.
टीम इंडियाचा (Team India) आयसीसी टूर्नामेंटमध्ये विशेषत: बाद फेरीतील विक्रम चांगला राहिलेला नाही. अशा स्थितीत उपांत्य फेरीसमोर एकही किवी संघ नसावा, अशी भारतीय संघाची इच्छा असेल.
हेड टू हेड
भारत आणि न्यूझीलंड (Team India vs New Zealand) यांच्यात एकूण 20 आंतरराष्ट्रीय T20 सामने खेळले गेले आहेत. टीम इंडियाने 11 सामने जिंकले आहेत तर न्यूझीलंडने 9 सामने जिंकले आहेत. त्याचवेळी टीम इंडियाला (Team India) टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) न्यूझीलंडला हरवता आले नाही. आतापर्यंत दोन्ही संघ वर्ल्ड कपमध्ये 3 वेळा आमनेसामने आले आहेत, भारतीय संघ तिन्ही वेळा पराभूत झाला आहे.
वर्ल्ड कपमध्ये आमने सामने
T20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup) भारत-न्यूझीलंड (Team India vs New Zealand) सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, 2007 वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ प्रथमच आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाला 10 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.तर T20 वर्ल्ड कप 2016 मध्ये न्यूझीलंडने भारताचा 47 धावांनी पराभव केला होता. त्याच वेळी, गेल्या वर्षी यूएईमध्ये, न्यूझीलंडने सलग तिसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचा पराभव केला. याशिवाय, किवी संघाने एकदिवसीय वर्ल्ड कप 2019 च्या उपांत्य फेरीत भारताचा पराभव केला, तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये टीम इंडियाचा (Team India) न्यूझीलंडकडून (New Zealand) पराभव झाला.