मुंबई: न्यूझीलंडचा कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज केन विल्यमसनला दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळेच तो भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकला नाही. न्यूझीलंड संघाला भारत विरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 असा पराभव पत्करावा लागला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या कसोटी सामन्यात केन दुखापतीमुळे खेळला नव्हता. आता न्यूझीलंडच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टेड म्हणाले की, कर्णधार केन विल्यमसन कोपरच्या दुखापतीमुळे किमान दोन महिने मैदानापासून दूर राहणार आहे. 


केनच्या नेतृत्वाखाली याच वर्षी न्यूझीलंडने भारताचा पराभव करून आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले होते. दक्षिण आफ्रिके विरुद्ध 17 फेब्रुवारीपासून दोन कसोटी सामन्याची सीरिज होणार आहे. या सीरिजमध्ये केन विल्यमसन पुन्हा मैदानात खेळताना दिसण्याची शक्यता आहे. 


केनला झालेल्या दुखापतीमुळे सध्या तो मैदानापासून दूर राहणार आहे. जवळपास दोन महिने तो मैदानात खेळताना दिसणार नाही असंही सांगितलं जात आहे. त्याला रिकव्हर होण्यासाठी 8 ते 10 आठवड्यांचा अवधी लागू शकतो अशी माहिती हेड कोचने दिली आहे. त्यामुळे चाहत्यांना आता प्रतिक्षा करावी लागणार आहे. 


सोशल मीडियावर केनचे चाहते आणि क्रिकेटप्रेमी तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत. कदाचित त्याच्या हाताची सर्जरी देखील होऊ शकते. त्याची सविस्तर माहिती येत्या काही दिवसात मिळू शकते असंही हेड कोच म्हणाले आहेत. केनच्या प्रकृतीकडे न्यूझीलंड संघासह क्रिकेटप्रेमींचंही लक्ष आहे.