कानपूर : भारत वि न्यूझीलंड दरम्यानच्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकत बॉलिंगचा निर्णय घेतलाय.


सामन्याचा लाईव्ह स्कोर पाहण्यासाठी क्लिक करा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कानपूरचे ग्रीनपार्क स्टेडियम भारतासाठी लकी असल्याने या मैदानावर विजय मिळवण्यासाठी भारतीय संघ सज्ज झालाय. विराट कोहली आणि कंपनीने यासाठी जोरदार तयारीही केलीये. 


दुसऱ्या वनडेत भारताच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. त्यानंतर फलंदाजांनीही त्यांना चांगली साथ दिली. तिसऱ्या सामन्यातही क्रिकेट चाहत्यांना भारतीय संघाकडून हीच अपेक्षा आहे. 


दुसरीकडे न्यूझीलंडचा संघही काही कमी नाहीये हे त्यांनी पहिल्या सामन्यात दाखवून दिलेय. त्यामुळे त्यांना कमी लेखण्याची चूक भारत तिसऱ्या सामन्यात करणार नाही.