पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्यास आणखी एका देशाचा नकार
पाकिस्तानला आणखी एक धक्का
नवी दिल्ली : पाकिस्तान क्रिकेट बोर्डला एक मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानं पाकिस्तानशी क्रिकेट मालिका खेळण्यास नकार दिला आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचं न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानं स्पष्ट केलं आहे. पाकिस्तान विरोधात तीन कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात संयुक्त अरब अमिरातच्या दौऱ्यावर जाणार होता.
सामन्यांच्या तारखा अद्याप निश्चित झालेल्या नाहीत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं न्यूझीलंडच्या या निर्णयाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. माजी कसोटी कर्णधार इम्रान खान पंतप्रधान होत असताना जगातले क्रिकेट संघ पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्यास नकार देत असल्यानं हा निर्णय जगभरात चर्चेत आला आहे.