नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या टेस्टची इंग्लंडच्या टीमची सुरूवातच शेवटसारखी झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑक्लॅंडमध्ये खेळल्या जात असलेल्या टेस्टमध्ये ट्रेट बोल्ट आणि टीम साऊदीच्या घातक बॉलिंगपुढे यजमान ५८ रन्सवर ऑल आऊट झाले. 


बॅट्समन गडगडले 



बोल्ट आणि साऊदी जोडीपुढे इंग्लिश बॅट्समन नवशिखे दिसू लागले. बोल्टने आपल्या टेस्ट करियरचा सर्वात बेस्ट स्पेल टाकत ३२ रन्स देऊन ६ विकेट्स घेतले. साऊदीने २५ रन्स देत ४ विकेट आपल्यानावे केले.


ब्रॉड पव्हेलियनमध्ये  


दोन्ही बॉलर्सच्या चांगल्या स्पेलनंतरपही कॅप्टन विलियम्सनच्या सुपमॅन कॅचचीच चर्चा जास्त होती.


टीम साऊदीच्या बॉलवर स्टुटर्ट ब्रॉड आपले खातेही खोलू शकला नाही. विलियम्सनने अप्रतिम झेल घेत ब्रॉडला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.


हवेत झेलला 


१६ व्या ओव्हरला टीम साऊदीने स्टुअर्ड ब्रॉडला एक टाकलेला चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला.


बॅटचा किनारा लागून चेंडू कॅप्टन विलियम्सनच्या डाव्या बाजूला गेला. त्याने शानदाक हवेत झेप घेत एका हातात चेंडू झेलला.