न्यूझीलंडचा भारतातील अखेरचा विजय; जेव्हा केन विल्यमसनचा जन्मही झाला नव्हता!

1988 नंतर अजूनही किवी संघाच्या पदरात विजय पडला नाही.
मुंबई : न्यूझीलंड संघाने अलीकडेच अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये भारतीय संघाचा पराभव केला आहे. 2019च्या वर्ल्डकप फायनलपासून ते 2021 मध्ये खेळल्या गेलेल्या टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपर्यंत किवी संघाने भारतीय संघाला खिंडार पाडलं आहे.
पण मायदेशात भारतीय संघाला कसोटीच्या फॉर्मेटमध्ये पराभूत करणं सोपं नाही. गेल्या 20 वर्षांत असं फार क्वचित वेळा घडलं जेव्हा भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंड संघाने आतापर्यंत भारतात फक्त 2 वेळा कसोटी जिंकल्या आहेत.
किवी संघ 33 वर्षांचा दुष्काळ संपवणार?
1955-56 मध्ये किवींना प्रथमच भारताचा दौरा केला, त्यानंतर त्यांनी 14 वर्षांनी पहिला कसोटी विजय मिळवला. 1969 नंतर, न्यूझीलंड टीमने पुढील कसोटी विजय 1988 वर्षी मिळवल होता. यानंतर अजूनही किवी संघाच्या पदरात विजय पडला नाही. मुख्य म्हणजे त्यावेळी सध्याचा कर्णधार केन विल्मसनचाही जन्म झाला नव्हता.
1988 मध्ये झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने 2-1 असा विजय मिळवला होता. मुंबईत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत किवी संघाने भारताचा 136 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. न्यूझीलंडचे महान अष्टपैलू रिचर्ड हॅडली आणि ऑफस्पिनर जॉन ब्रेसवेल या सामन्याचे हिरो होते.
या विजयानंतर कसोटी फॉरमॅटमध्ये भारतीय भूमीवर किवी संघाने विजय मिळवला नाहीये. मुख्य म्हणजे किवी संघाच्या या ऐतिहासिक विजयानंतर दोन वर्षांनी सध्याचा न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनचा जन्म झाला.
केन विल्यमसनचा जन्म 8 ऑगस्ट 1990 रोजी झाला (वय 31 वर्षे)
न्यूझीलंडचा भारतातील शेवटचा विजय - 24 नोव्हेंबर 1988 (33 वर्षे)