नवी दिल्ली : क्रिकेटच्या मैदानात तुम्ही बॅट्समनला किंवा विकेटकीपरला हेल्मेट घातलेलं पाहिलं असेल. मात्र, तुम्ही कधी एखाद्या बॉलरला हेल्मेट घालून बॉलिंग टाकत असल्याचं पाहिलं आहे का?


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐकायला आणि पहायला विचित्र वाटेल मात्र हे खरं आहे. न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या टी-२० मॅचमध्ये एका बॉलरने चक्क हेल्मेट घालून बॉलिंग टाकली. 


नॉर्दर्न नाईट्स आणि ओटैगो यांच्यात खेळलेल्या टी-२० मॅचमध्ये ओटैगोचा बॉलर वॉरेन बार्नेस याने हेल्मेट घालून बॉलिंग केली.


हेल्मेट परिधान करुन बॉलिंग करणाऱ्या या बॉलरने ३३ रन्स देत ३ विकेट्सही घेतले. २५ वर्षीय बार्नेस याने नॉर्दर्न नाईट्सच्या बॅट्समनकडून खेळल्या जाणारा बॉल लागू नये तसेच आपला बचाव व्हावा म्हणून हेल्मेट घातलं होतं.


त्यांच्या कोचने सांगितले की, बॉलिंग टाकताना बार्नेस पुढे झुकतो त्यामुळे त्याच्या डोक्याला बॉल लागण्याची शक्यता असते. त्यामुळे बॉलिंग टाकताना बार्नेस हेल्मेट घालतो.



पाहा व्हिडिओ