Big Bash League 2022-23: ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या बिग बॅश लीग स्पर्धेतील (Big Bash League) तिसरा सामना मेलबर्न रेनेगेड्स (Melbourne Renegades) आणि ब्रिस्बेन हीट (Brisbane Heat) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात (BBL) धक्कादायक प्रकार पहायला मिळाला आहे. या घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला असून तो सध्या सोशल मीडियावर (Viral Video) व्हायरल होताना दिसतोय. (Nic Maddinson Stumps bail falls mysterously in Big Bash League nick maddinson Marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेलबर्न रेनेगेड्सच्या (Melbourne Renegades) डावाच्या 9व्या षटकात ही घटना घडली. कर्णधार निक मॅडिन्सन (nick maddinson) बॅटिंग करत होता. ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर एक बेल आपोआपच स्टंपच्या खाली पडली. हा प्रकार पाहून मॅडिन्सन देखील आश्चर्यचकित झाला, त्याचा पाय, बॉल किंवा चेंडू विकेटला लागला नव्हता. मात्र, स्टंप्स उडाल्याचं पहायला मिळालं.


आणखी वाचा - IND vs SL: नवं वर्ष नवा कॅप्टन! रोहित शर्माला मिळणार 'नारळ' ? BCCI मोठ्या निर्णयाच्या तयारीत


निक मॅडिन्सनने पूल शॉट मारण्याचा प्रयत्न केला असताना अचानक बेल्स खाली पडल्या (Stumps bail falls mysterously) आणि स्टंप्सची लाईट लागली. निक मॅडिन्सन पुन्हा पवेलियनमध्ये परत जात असताना खेळाडूंनी त्याला थांबवलं. मोठ्या स्क्रीनवर पुन्हा दाखवण्यात आलं. त्यावेळी निक मॅडिन्सनची चूक नसल्याचं समोर आलं आणि त्याला नॉट आऊट (Not Out) देण्यात आलं.


पाहा Video -



दरम्यान, निक मॅडिन्सन आणि ऍरॉन फिंच (Aaron Finch) त्यावेळी मैदानात होते. फिंचने त्यावेळी अंपायर्सशी (Umpires) मदत घेतली आणि थर्ड अंपायरची (Third Umpire) मदत मागितली. विकेटच्या बेल्स उडाल्यावर नेमकं काय झालं? हे कोणाच्या लक्षात आलं नाही. हवेने बेल्स उडाल्या, असं काहींचं म्हणणं आहे. तर काही नेटकऱ्यांनी भूताच्या गोष्टी रंगल्या आहेत.