सामन्यानंतर लगेच निघून गेला, प्लेअर ऑफ द सिरीज घेण्यासाठीही थांबला नाही... Nicholas Pooran ने असं का केलं?
Nicholas Pooran : वेस्ट इंडिजचा फलंदाज निकोलस पूरन ( Nicholas Pooran ) ची बॅट चांगलीच तळपली. संपूर्ण सिरीजमध्ये त्याने 141.94 च्या स्ट्राईक रेटने 176 रन्स ठोकले. दरम्यान सिरीजमधील शेवटचा सामना संपल्यानंतर पूरना मॅन ऑफ सिरीजचा ( Man Of the series ) अवॉर्ड देण्यात आला. मात्र यावेळी निकोलस अवॉर्ड घेण्यासाठी मैदानावर न आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.
Nicholas Pooran : भारत विरूद्ध वेस्ट इंडिज ( IND vs WI ) यांच्यामध्ये रविवारी शेवटचा टी-20 सामना खेळवण्यात आला. दोन्ही टीम्ससाठी हा करो या मरो च्या परिस्थितीचा सामना होता. या सामन्यात टीम इंडियाची ( Team India ) पदरी पराभव आला. अखेर 5 सामन्यांच्या या सिरीजमध्ये वेस्ट इंडिजने 3-2 ने ही सिरीज आपल्या नावे करून घेतलीये. या सिरीजमध्ये वेस्ट इंडिजचा फलंदाज निकोलस पूरन ( Nicholas Pooran ) ची बॅट चांगलीच तळपली. संपूर्ण सिरीजमध्ये त्याने 141.94 च्या स्ट्राईक रेटने 176 रन्स ठोकले. दरम्यान सिरीजमधील शेवटचा सामना संपल्यानंतर पूरना मॅन ऑफ सिरीजचा ( Man Of the series ) अवॉर्ड देण्यात आला. मात्र यावेळी निकोलस अवॉर्ड घेण्यासाठी मैदानावर न आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.
रविवारी झालेल्या भारताविरुद्धच्या निर्णायक सामन्यातही पूरनने ( Nicholas Pooran ) तुफान फटकेबाजी केली. या सामन्यात पुरणने 47 रन्सची खेळी करत टीमच्या विजयात मोलाची भूमिका साकारली. वेस्ट इंडिजला सिरीज 3-2 ने जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या पूरनला ( Nicholas Pooran ) शेवटच्या सामन्यानंतर प्लेयर ऑफ द सिरीजचा ( Man Of the series ) पुरस्कार देण्यात आला. मात्र यावेळी सामना संपल्यानंतर तातडीने त्याने टीमची साथ सोडून दिली होती. ज्यामुळे मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड स्विकारण्यासाठी उपस्थित नव्हता.
क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार, निकोलस पूरन सामना संपल्यानंतर तातडीने दुसरीकडे क्रिकेट खेळण्यासाठी निघून गेला. यासाठी त्याची फ्लाईट होती. याच कारणामुळे तो सामना संपताच तातडीने निघून गेला. त्यामुळे त्याचा मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड कर्णधार रोवमॅन पॉवेलने स्विकारला. प्लेयर ऑफ द सिरीज ( Man Of the series ) पुरस्कारासोबत पूरनला संपूर्ण मालिकेत सर्वाधिक सिक्स मारल्याबद्दल हार्ड रॉक कॅफेच्या सौजन्याने ब्रँडेड इलेक्ट्रिक गिटार देखील भेट दिला.
पूरनने या सिरीजमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली. आतापर्यंत या सिरीजमध्ये तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. मात्र पॉवेलने शेवटच्या सामन्यात त्याला बढती देऊन शाई होपच्या जागी क्रमांक-3वर पाठवण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्याच ओव्हरमध्ये काईल मेयर्स बाद झाल्यानंतर पूरनला फलंदाजीची संधी मिळाली. यावेळी त्याने टीम इंडियाच्या गोलंदाजांना चांगलंच धुतलं आणि ओपनर ब्रँडन किंगसोबत दुसऱ्या विकेटसाठी 107 रन्सची पार्टनरशिप केली.