INDW Vs AUSW: शेवटची ओव्हर...शेवटचा बॉल...अंपायरच्या `त्या` निर्णयावर टीका
भारतीय महिला क्रिकेट टीमने शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना गमावला.
दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट टीमने शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना गमावला. भारत निश्चितच विजयाच्या उंबरठ्यावर होता, पण एका नो बॉलने गेम उलटला. ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. मात्र आता या नो बॉलवरून सोशल मीडियावर एक वेगळाच गोंधळ सुरू झाला आहे.
शेवटी दिलेल्या या नो-बॉलवरून अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. दरम्यान हा दिलेला नो बॉल अंपायरचा चुकीचा निर्णय असल्याचं बोललं जातं आहे.
नेमकं काय झालं शेवट्या बॉलवर?
ऑस्ट्रेलियाला शेवटच्या बॉलवर तीन धावांची गरज होती. भारताची स्टार गोलंदाज झुलन गोस्वामी गोलंदाजी करत होती. तिने शेवटचा चेंडू अशा प्रकारे फेकला की तिने मूनी शॉट मारण्याच्या प्रयत्नात तिला विकेट दिली. भारताने आनंद साजरा करायला सुरुवात केली होती, पण नंतर पंचांनी खेळ बदलला.
त्या शेवटच्या चेंडूवर थर्ड अंपायरची मदत घेण्यात आली आणि मग त्या बॉलला नो बॉल घोषित करण्यात आलं. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियाला फ्री हिट मिळाली आणि मग शेवटच्या चेंडूवर दोन धावा केल्याने सामना ऑस्ट्रेलियाच्या खात्यात गेला.
लोकांनी व्यक्त केली नाराजी
आता सोशल मीडियावर त्या शेवटच्या नो-बॉलबद्दलही चर्चा सुरू झाली. थर्ड अंपायरने लीगल डिलीवरी म्हणून नो बॉल घोषित केला. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू लिसा स्थळेकरने तिच्या वतीने सोशल मीडियावर दोन फोटोस शेअर केलेत. शेवटच्या चेंडूला नो बॉल कोणत्या आधारावर दिला गेला हे ती स्वत: समजू शकत नाही.
एका युजरने सांगितलं की, जर हा पुरुषांचा सामना असला तर शेवटच्या चेंडूला नो बॉल म्हणता आलं नसतं. थर्ड अंपायर विराट कोहलीच्या उपस्थितीत असा निर्णय देऊ शकले नसते. सोशल मीडियावर अशा कमेंट्सचा पूर आला आहे.
दुसऱ्या वनडेमध्ये भारताने प्रथम फलंदाजी करताना स्मृती मंधानाच्या 86 धावांच्या संयमी खेळीच्या जोरावर सात बाद 274 रन्स केल्या. यानंतर, 275 रन्सचा लक्ष्याचा पाठलाग करणार्या ऑस्ट्रेलियाने त्यांच्या डावाच्या पहिल्या 25 ओव्हरमध्ये दडपणात होती. परंतु मूनीच्या 133 चेंडूत नाबाद 125 धावांनी ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत आली.