नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी हा २०१९ मध्ये होणा-या वर्ल्ड कपमध्ये असेल किंवा नाही, हे अजून ठरले नाही. मात्र, टीम इंडियाचा माजी दमदार खेळाडू विरेंद्र सेहवाग म्हणाला की, ‘मला नाही वाटत की, कोणताही खेळाडू सध्या धोनीची जागा घेऊ शकतो'.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेहवाग म्हणाला की, `ऋषभ पंत चांगला आहे. मात्र, त्याला धोनीची जागा घेण्यासाठी अजून बराच वेळ आहे. असे वर्ल्ड कपनंतरच होऊ शकते. धोनीच्या पर्यायाबाबत आपल्याला २०१९ च्या वर्ल्ड कपनंतरच विचार करायला हवा. तोपर्यंत पंतने अनुभव घ्यायला हवा’.


एका मुलाखतीत सेहवाग म्हणाला की, ‘धोनी हा फिट रहावा, अशी क्रिकेट प्रेमींनी प्रार्थना करायला हवी. धोनी रन्स करतोय की, नाही याची चिंता करू नये. आता केवळ एकच प्रार्थना केली पाहिजे की, धोनी २०१९ च्या वर्ल्ड कपपर्यंत फिट रहायला हवा. मधल्या फळीत फलंदाजी करण्याची जो अनुभव धोनीकडे आहे तो कुणाकडेही नाही’, असे सेहवाग म्हणाला. 


क्रिकेट विश्वात अशीही चर्चा ऎकायला मिळत आहे की, धोनीचा फॉर्म चांगला नसला तर केएल राहुल विकेटकिपिंगची जबाबदारी सांभाळेल. मात्र, सेहवाग या विचारा विरोधात आहे. तो म्हणाला की, ‘मी कधीही अशा विचाराचं समर्थन करणार नाही’.


सेहवागला वाटतं की, ‘मधल्या फळीतील फलंदाजांना अधिक संधी दिली गेली पाहिजे. जेणेकरून वर्ल्ड कपच्या आधी प्रत्येक खेळाडूकडे साधारण १०० सामन्यांचा अनुभव असेल. त्यांच्याकडे प्रत्येक परिस्थीतीमध्ये खेळण्याची प्रतिभा असली पाहिजे. अनुभवामुळे कुणीही दबावाला दूर करू शकतो. कठिण काळातही सामन्या जिंकला जाऊ शकतो. जर त्यांना संधी मिळाली नाही तर या गोष्टीमुळे टीम कमजोर होईल’.