IND vs ENG : कॅप्टन रोहित शर्माचा `मास्टर प्लॅन` तयार, पाहा कशी असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11
India Probable Playing 11 for 5th Test : बीसीसीआयने टीम इंडियाच्या स्कॉडमध्ये जास्त बदल केले नाहीत. त्यामुळे आता टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11 कशी असेल? असा सवाल विचारला जातोय.
India Probable Playing 11 for 5th Test : धर्मशाला येथे होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी (IND vs ENG 5th Test) सामन्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाच्या स्कॉडची घोषणा केली. टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुल (KL Rahul) हा पाचव्या कसोटीला देखील मुकणार असल्याची माहिती बीसीसीआयने दिलीये. तर जसप्रीत बुमराहचं कमबॅक झालंय. त्यामुळे आता टीम इंडियामध्ये कभी खुशी कभी गम असं वातावरण पहायला मिळत आहे. अशातच आता मालिका जिंकली असली तरी बीसीसीआयने टीम इंडियाच्या स्कॉडमध्ये जास्त बदल केले नाहीत. त्यामुळे आता टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11 कशी असेल? असा सवाल विचारला जातोय.
यशस्वी जयस्वाल याने ज्याप्रकारे फलंदाजी केलीये, त्यामुळे त्याला बाहेर बसवणं मुर्खपणा ठरेल. तर सलामीला कॅप्टन रोहितच येईल. त्यानंतर शुभमनला पुन्हा नक्कीच संधी मिळेल. तर मिडल ऑर्डरमध्ये बदल दिसू शकतो. देवदत्त पडिक्कलला संधी मिळण्याची शक्यता आहे. रजत पाटीदारला पुन्हा संधी मिळाली तर नक्कीच रोहितचं कौतूक होईल. मात्र, अशी शक्यता दिसत नाहीये.
सरफराज खान आणि ध्रुव जुरेल मिडल ऑर्डरचा हिस्सा असतील, रोहित या दोन युवा खेळाडूंची आणखी परीक्षा घेऊ शकतो. तर फिरकी डिपार्टमेंटमध्ये रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव आणि जडडू कायम राहण्याची शक्यता आहे. तर जसप्रीत बुमराहसोबत आकाश दीपला संधी मिळणार की मोहम्मद सिराज याला? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11 :
यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, देवदत्त पडिक्कल, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप/मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
पाचव्या टेस्टसाठी टीम इंडियाचा स्कॉड
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उप-कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.