मुंबई : आगामी रणजी स्पर्धांमध्ये यापुढे ईशान्य भारतातील मेघालय, मणिपूर, मिझोराम, सिक्कीम, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश असे सहा राज्यदेखील आपले स्वतंत्र संघ  उतरवणार आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआयच्या खेळ सुधारणा समितीचे प्रमुख रत्नाकर शेट्टी ईशान्य भारतातील या सहा राज्यांना प्रवेश देण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण करणार आहे. यंदाच्या रणजी स्पर्धा येत्या ६ ऑक्टोबरपासून सुरु होत आहेत. त्यामुळे इतक्या अल्पावधीत या संघांना समावून घेणं शक्य नाही. पण आगामी हंगामात या सहा संघांना प्रवेश दिला जाईल. अशी माहिती देण्यात आली आहे. 


बीसीसीआयच्या १६ वर्षाखालील मुलांसाठी खेळवल्या जाणाऱ्या 'विनू मंकड' आणि २३ वर्षाखालील मुलांसाठी खेळवल्या जाणाऱ्या 'सी. के. नायडू' स्पर्धेसाठीही ईशान्येच्या राज्यांकरता स्वतंत्र विभाग करण्यात आला आहे. 


सहाही राज्यांच्या क्रिकेट संघटनांना मिळणाऱ्या निधीबद्दलही प्रशासकीय समितीने सकारात्मक विचार केला आहे. प्रत्येक संघटनेला  लोढा समितीच्या शिफारशींचा कमीत कमी ८० टक्के अवलंब करु, असं अध्यक्षांच्या सहीचं प्रतिज्ञापत्र दाखलं करावं लागणार आहे. त्यामुळे लवकर भारतीय संघातही लवकरच  ईशान्येकडील राज्यांचे खेळाडू झळकण्याची शक्यता आहे.