AUS vs BAN: मार्श, वॉर्नर नाही तर `या` 2 खेळाडूंना कमिंसने दिलं विजयाचं श्रेय, कर्णधाराचं मोठं विधान
AUS vs BAN: पॅट कमिंसच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 62 रन्सने पराभव केला. यावेळी सामन्यानंतर पॅट कमिंसने 2 खेळाडूंना विजयाचं श्रेय दिलं आहे.
AUS vs BAN: बंगळूरूच्या चिन्नस्वामी स्टेडियममध्ये 20 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया विरूद्ध पाकिस्तान यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या टीमने पहिल्यांदा टॉस जिंकून 367 रन्सचा डोंगर उभारला. यानंतर पाकिस्तानच्या टीमचा 62 रन्सने पराभव झाला. सलग दुसऱ्या विजयानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिंस फार खूश दिसून आला.
पॅट कमिंसच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 62 रन्सने पराभव केला. यावेळी सामन्यानंतर पॅट कमिंसने 2 खेळाडूंना विजयाचं श्रेय दिलं आहे.
कमिंसने 'या' खेळाडूंना दिलं विजयाचं श्रेय
पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर कर्णधार पॅट कमिन्सने या विजायचं श्रेय दोन खेळाडूंना दिले आहे. कमिन्सने मिचेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नरच्या झंझावाती खेळीचं कौतुक केलंय. कमिंस म्हणाला की, चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळणं नेहमीच अवघड असतं, पण जिंकणं चांगलं असतं. तुम्हाला ब्रेकथ्रू मिळतो आणि काहीवेळा नवीन फलंदाजासाठी ते अवघड असते. स्टॉइनिसने जोरदार फटकेबाजी करत चांगला खेळ केला. इतकंच नाही तर एडम झम्पानेही त्याचा उत्तम क्लास दाखवून दिला. मधल्या फळीत तो आमच्यासाठी खरा विकेट घेणारा गोलंदाज आहे, असं म्हणत कमिंसने झम्पा आणि स्टॉयनिसचं कौतुक केलंय.
ऑस्ट्रेलियाची पाकिस्तानवर मात
पहिली फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने 367 धावांचा डोंगर रचला. वॉर्नर आणि मार्शने पहिल्या विकेटसाठी 259 धावांची पार्टनरशिप करत विक्रम केला. याला उत्तर देताना पाकिस्तानचा संघ 305 धावांवर ऑलआऊट झाला. डेव्हिड वॉर्नरने ऑस्ट्रेलियातर्फे सर्वाधिक163 धावा केल्या. यात त्याने 9 षटकार आणि 14 चौकारांची आतषबाजी केली. तर मिचेल मार्शने 9 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने 121 धावा फटकावल्या. पण ही जोडी बाद झाली आणि ऑस्ट्रेलियाची फलंदाजी ढेपाळली, सुरुवातीला चारशे धावांचा टप्पा गाठणार असं वाटत असताना ऑस्ट्रेलियाला 9 विकेट गमावत 367 धावा करता आल्या.
पाकिस्तानतर्फे अब्दुल्ला शफीक 64 तर इमाम उल हकने 70 धावा केल्या. कर्णधार बाबर आझम पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. बाबर 18 धावा करुन बाद झाला. अखेरील 62 रन्सने पाकिस्तानचा पराभव आहे.