मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने नुकतंच टी-20 वर्ल्डकपनंतर भारताच्या टी-20 संघाचे कर्णधारपद सोडलं. कोहलीनंतर त्याच्या जागी रोहित शर्माची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. आता विराट कोहली लवकरच एकदिवसीय संघाचं कर्णधारपद सोडणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीने वनडेचं कर्णधारपद सोडलं अशा स्थितीत वनडे संघासाठीही नव्या कर्णधाराची गरज भासणार आहे. रोहितही या पदाचा मोठा दावेदार आहे, पण विराटऐवजी आणखी दोन खेळाडू एकदिवसीय संघाचे कर्णधार होऊ शकतात.


हा खेळाडूही मोठा दावेदार


विराट कोहली आणि रोहित शर्माच्या जागी टीम इंडियामध्ये आणखी एक खेळाडू आहे ज्याला बीसीसीआय वनडे संघाचा कर्णधार बनवू शकते. हा खेळाडू म्हणजे केएल राहुल. केएल राहुल हा देखील एक वरिष्ठ खेळाडू आहे आणि त्याने आयपीएलमध्ये पंजाब किंग्जचं नेतृत्व केलं आहे. 


बीसीसीआयने इतर संघांप्रमाणे प्रत्येक फॉरमॅटसाठी कर्णधाराची निवड केली, तर राहुलही मोठा दावेदार आहे. राहुल चांगली विकेटकीपिंगही करतो आणि त्याने कर्णधाराची भूमिका बजावली तर त्याला खेळ अधिक समजतो.


पंत देखील कर्णधारपदासाठी दावेदार


राहुलप्रमाणेच टीम इंडियाचा युवा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतही टीम इंडियाचा नवा कर्णधार होण्याचा दावेदार असू शकतो. खरंतर पंतने भारतीय संघात खूप दिवसांपासून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. निवड समिती माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीप्रमाणे पंतचा विचार करू शकतात.


पंत हा देखील धोनीसारखा सध्याचा विकेटकीपर आहे आणि त्याला विकेटच्या मागून खेळ चांगल्या पद्धतीने समजण्यास मदत होते. त्याच वेळी, आयपीएल 2021च्या पहिल्या सहामाहीत, पंतने दिल्ली कॅपिटल्सचे उत्तम पद्धतीने नेतृत्व केलं होतं.